Parliament Expense : अबब ! संसदेतला मिनिटा-मिनिटाचा खर्च लाखांमध्ये; विरोधकांमुळे कोट्यवधी पाण्यात

BJP Vs Congress : विरोधकांमुळे जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुरडा; भाजपचा आरोप
Parliament
ParliamentSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू झालेले असून ते ११ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. विरोधकांनी मात्र संसदेच्या पहिल्या दिवसांपासून मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. यामुळे वारंवार लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांवर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची वेळ आली. यामुळे सभागृहाच्या वेळेसह जनतेच्या पैशांचाही अपव्यय होत असून याला विरोधक जबाबदार असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. (Latest Political News)

Parliament
Sanjay Raut On Sharad Pawar : मोदींशेजारी बसण्याआधीच संजय राऊतांनी पवारांना 'असे' अडकवले...

अधिवेशनात कामकाज सुरू असताना लोकसभेच्या सभागृहाच्या खर्चाचा लेखाजोखा भाजपच्या वतीने ट्विट करण्यात आला आहे. यात मिनिट, तास आणि दिवसाचा किती खर्च येतो याची आकडेवारी देत या नुकसानीला फक्त विरोधक कारणीभूत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पेटलेल्या मणिपूरबाबत सभागृहात येऊन निवेदन देत नसल्याने विरोधक आक्रमक झालेले आहेत. तर दुसरीकडे या विरोधकांमुळे सभागृहाचे कामकाज पूर्ण होत नसल्याने कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या संघर्षात नव्याने भर पडणार आहे.

Parliament
Jawali BJP News : जावलीकरांना हवाय आणखी एक आमदार....हे आहे कारण ?

संसदेत विरोधक कुठल्याही मुद्द्यावर चर्चा होऊ देत नाहीत. सभागृहातील कामकाज सुरळीत होऊ नये यासाठीच विरोधक गोंधळ घालत आहेत, असा हल्लाबोल करत भाजपने सभागृहाचा मिनीट, तास आणि दिवसाचा खर्चचा हिशेबच दिला आहे. सभागृहाचे प्रतिमिनिटाचा अंदाजे खर्च अडीच लाख रुपये असून हा खर्च प्रतितास दीड कोटी तर दिवसाचा साडेदहा कोटी रुपायांवर जात असल्याचे भाजपच्या वतीने स्पष्ट केले आहे.

सभागृहात कामकाज होत नसल्याने दरदिवसाचा साडेदहा कोटी रुपयांचा खर्च केवळ विरोधकांमुळे वाया जात असल्याचा आरोपही भाजपच्या वतीने केला आहे. "विरोधकांना दोन्ही सभागृहात चर्चा करायची नाही आणि सभागृह सुरळीत चालू देऊ द्यायचे नाही. हा पैसा देशातील जनतेचा आहे, जो विरोधकांच्या गदारोळात रोज वाया जात आहे. जनतेला उत्तर हवे आहे, विरोधकांची ही उधळपट्टी किती दिवस चालणार?", असा प्रश्नही यावेळी भाजपच्या वतीने उपस्थित करत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com