पंतप्रधानांनी लोकार्पण केलेला पंधरा हजार कोटींचा एक्सप्रेसवे पाच दिवसांच्या पावसात उखडला!

भाजपचे खासदार वरूण गांधी यांच्याकडून घरचा आहेर.
Bundelkhand expressway develops potholes, Bundelkhand expressway News
Bundelkhand expressway develops potholes, Bundelkhand expressway NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मागील आठवड्यातच लोकार्पण केलेल्या एक्सप्रेसवे पाच दिवसांच्या पावसातच उखडल्याचे समोर आले आहे. या एक्सप्रेसवेच्या स्थितीची छायाचित्र, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. एक्सप्रेसवेसाठी तब्बल पंधरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण पावसात पाच दिवसही या रस्ता टिकू न शकल्याने चोहोबाजून टीका होऊ लागली आहे. (Bundelkhand expressway Latest News)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) 296 किलोमीटर लांबीच्या बुंदेलखंड एक्सप्रेसवेवर चिरीया सालेमपूरजवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. गुरुवारी या भागात जोरदार पाऊस झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी 16 जुलै रोजीच या रस्त्याचे उदघाटन केले आहे. जवळपास सात जिल्ह्यांतून हा मार्ग जातो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचं या कामाकडे विशेष लक्ष होतं.

Bundelkhand expressway develops potholes, Bundelkhand expressway News
BS Yediyurappa : येडियुरप्पांचा उत्तराधिकारी ठरला; विधानसभा निवडणूक न लढण्याची घोषणा

रस्त्याचे फोटो समोर आल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने दुरूस्ती सुरू करण्यात आली. दुरुस्तीसाठी बुलडोझर पाठवून काही भागातील रस्ता उखडण्यात आला. त्यानंतर हा रस्ता दुरूस्त करून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी योगी सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी या मार्गाचा व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे. पंधरा हजार कोटी रुपये खर्चून बनवलेला एक्सप्रेसवे जर पाच दिवसांचा पाऊसही झेलू शकत नसेल तर त्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. या प्रकल्पाचे प्रमुख, संबंधित अभियंता आणि जबाबदार कंपन्यांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी गांधी यांनी केली आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपच्या विकासाच्या गुणवत्तेचे हे उदाहरण आहे. बुंदेलखंड एक्सप्रेसच्या मोठ्या लोकांनी उद्घाटन केले होते आणि आठवडाभरातच भ्रष्टाचार बाहेर आला आहे, असं ट्विट यादव यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com