Hindu-muslim Politics: 'तर.. शाहरुख खानला जिवंत जाळून टाकेन'; संत परमहंसांची धमकी

Pathan Controversy: पठाण चित्रपटावरुन देशात नवा वादाला तोंड फुटलं आहे.
Shahrukh Khan
Shahrukh Khan Sarkarnama
Published on
Updated on

Pathan Controversy: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे काही नावच घेत नाहीये. हिंदू संघटनांकडून ‘बेशरम रंग’ हे गाणं चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आता चित्रपटाला विरोध करत अयोध्येतील महंत परमहंस दास यांनी अभिनेता शाहरुखबाबत मोठे वक्तव्य केले आहे. “जर जिहादी शाहरुख मला भेटला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन.” अशी थेट धमकीच परमहंंस दास यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Shahrukh Khan
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा डिवचलं; म्हणाले, ''महाराष्ट्राला इंचभरही जमीन..!''

महंत परमहंस दास यांचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. “ज्या दिवशी शाहरुख खान मला भेटेल त्या दिवशी त्याची कातडी सोलून टाकीन आणि जिवंत जाळेन. माझी माणसं त्याला मुंबईत शोधत आहेत. जर कोणी त्याला शोधून काढले आणि सनातनी सिंहाने त्याला जिवंत जाळले, तर मी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेन. एवढेच नाही तर मी तिन्ही खानांना आव्हान दिलं आहे. पहिलं शाहरुख खान, नंतर आमिर खान आणि तिसरा म्हणजे सलमान खान या तिघांसाठी मी फाशीची शिक्षा ठरवली आहे, अशा शब्दांत परमहंस व्हिडीओ मध्ये त्यांनी धमकी दिली आहे.

Shahrukh Khan
‘...तर भारत जोडो यात्रा तातडीने थांबवा’ : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

“शाहरुख खानचा धर्म इस्लाम आहे, आजपर्यंत त्याने त्याच्या धर्मावर कोणतीही वेब सिरीज किंवा कोणताही चित्रपट बनवला नाहीये. मी तुम्हाला आव्हान करतो की, त्याने हलालावर चित्रपट बनवावा. तिहेरी तलाक, पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून दाखवावा. पाच मिनिटांत किती तुकडे होतील हे कोणीही मोजू शकणार नाही. हिंदू मानवतावादी आहे हे फक्त त्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांची चेष्टा करा आणि पैसे कमवा, म्हणूनच आम्ही सर्वांचा आदर करतो,” असंही संत परमहंस म्हणाले.

पठाण सिनेमाला एवढा विरोध का?

पठाण सिनेमाचं पहिलं गाणं 'बेशरम रंग' 12 डिसेंबर रोजी रिलीज झालं होतं. या गाण्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने घातलेल्या बिकीनीच्या भगव्या रंगावर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आल्याचा दावा या संघटनांकडून केला जात आहे. ज्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी विचारपूर्वक रणनीती आखून पैसे कमविण्याचा लोकांनी धंदा सुरू केला आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत काही बोल्ड सीन्सही दीपिकाने दिले आहेत. त्यामुळे पठाण चित्रपटावर बहिष्काराची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com