Sharad Pawar News : पवारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; राष्ट्रवादी खासदारावरील निलंबन मागे घेण्याची केली विनंती

Sharad Pawar Meets Lok Sabha Speaker: केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांना दोषी ठरविण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे फैजल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Om Birla-Sharad Pawar-Mohammad Faisal
Om Birla-Sharad Pawar-Mohammad FaisalSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) लक्षद्वीपचे खासदार पी. पी. मोहम्मद फैजल (Mohammad Faizal) यांना केरळमधील एका सत्र न्यायालयाने खुनी हल्ल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा ठोठवली होती. त्यानंतर फैजल यांना संसदेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांना दोष ठरविण्यास स्थगिती दिली आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (ता. ३० जानेवारी) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची भेट घेऊन निलंबनाची कारवाई मागे घेण्याची विनंती केली आहे. (Pawar meets Lok Sabha Speaker; Request to withdraw suspension of NCP MP Mohammad Faizal)

केरळमधील एका सत्र न्यायालयाने खासदार फैजल यांना २००९ मधील एका राजकीय प्रकरणात खुनी हल्ल्या प्रकरणी १० वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर २०१३ मधील लीली थॉमस प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या जेजमेंटनुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा झाली असेल तर संबंधित लोकप्रतिनिधी तत्काळ निलंबित होतो. त्यानुसार फैजल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील संख्याबळ एकने घटले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज खासदार मोहम्मद फैजल यांना सोबत घेऊन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांना दोषी ठरविण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे फैजल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी ही कारवाई मागे घेण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना केली आहे.

Om Birla-Sharad Pawar-Mohammad Faisal
Laxman Dhoble On Rajan Patil : राष्ट्रवादी सोडल्यानंतर ढोबळेंनी प्रथमच केले राजन पाटलांचे कौतुक : म्हणाले, ‘वाकड्या नजरेने कधी...’

याबाबत शरद पवार यांनी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, केरळ उच्च न्यायालयाने लक्षद्वीपच्या माजी खासदार पी पी मोहम्मद फैजल यांची शिक्षा स्थगित केल्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून अपात्रतेची कारवाई मागे घेण्याची विनंती केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com