सलग दुसऱ्या दिवशी दणका; पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांची होरपळ

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) मागील चार महिन्यांहून अधिक काळ स्थिर असलेले दर आता वाढू लागले आहेत.
Petrol and Diesel prices hike
Petrol and Diesel prices hikeSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) मागील चार महिन्यांहून अधिक काळ स्थिर असलेले दर आता वाढू लागले आहेत. बुधवारी सलग दुसऱ्यादिवशी इंधन कंपन्यांनी दरवाढीचा दणका दिला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या दरवाढीने होरपळून निघणार आहेत. मुंबईत पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) कंपन्यांकडून जवळपास चार महिने दरवाढ करण्यात आली नव्हती. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाचा भडका उडूनही कंपन्या दरवाढ करत नव्हत्या. आता निवडणुकांचा निकाल लागून ११ दिवस उलटताच मंगळवारी कंपन्यांनी पहिला झटका दिला. पेट्रोल, डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ केली. तर स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर तब्बल 50 रुपयांनी महागला. (Petrol Diesel price hike News)

Petrol and Diesel prices hike
राजकीय घडामोडींना वेग; अखिलेश यांच्यापाठोपाठ आझम खान यांचाही राजीनामा

देशभरात बुधवारीही पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. दिल्लीत हे दर ८० पैशांनी तर मुंबईत ८५ पैशांनी वाढवण्यात आले. त्यामुळे मुंबईतील पेट्रोलचे दर १११.६७ रुपये आणि डिझेलचे दर ९५.८५ रुपये प्रति लिटरवर पोहचले. तर दिल्लीतील दर अनुक्रमे ९७.०१ आणि ८८.२७ रुपयांवर गेले आहेत.

रम्यान, मंगळवारी घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रतिलिटर तब्बल 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत डिझेलचा दर प्रतिलिटर 122.05 रुपयांवर गेला आहे. दिल्लीत घाऊकचा डिझेल दर प्रतिलिटर 115 रुपये आहे. घाऊक ग्राहकांमध्ये बस चालवणाऱ्या राज्य सरकारी कंपन्या, मॉल तसेच, इतर उद्योग त्यांच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करतात. त्यांच्यासाठी किरकोळ ग्राहकांपेक्षा आता अधिक दर आकारण्यात आला आहे.

Petrol and Diesel prices hike
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ३५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिली सरकारी नोकरी!

या दरवाढीविरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून मंगळवारी संसदेतही खासदारांनी यावर चर्चा करण्याची मागणी करत गदारोळ घातला. त्यामुळे राज्यसभेतील कामकाज काही कालावधीसाठी तहकूब करावे लागले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला. पेट्रोल – डिझेल दरवाढीचा लॉकडाऊन संपला असून आता विकास सुरू झाला आहे, असं त्यांनी मंगळवारी म्हटलं होतं. आम आदमी पक्षाने ट्विट करत म्हंटले होते की, गॅस ५० रुपयांनी महाग, डिझेल २५ रुपयांनी महाग, पेट्रोल ११० रुपयांच्या पार. सांगा मित्रांनो देशाचा जीडीपी वाढत आहे की नाही?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com