PM Modi News : राहुल गांधींचा 'तो' व्हायरल व्हिडीओ अन् PM मोदींची मोठी घोषणा

PM Modi on Driver Bhawan : पंतप्रधान मोदींनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोच्या कार्यक्रमात मोठी घोषणा केली...
PM Modi, Rahul Gandhi
PM Modi, Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Bharat Mobility Expo 2024 :

दिल्लीत भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोच्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या गॅरंटीची घोषणा केली. त्यांनी देशातील बॅटरी उत्पादकांना आवाहन करत देशांतर्गत साधन सामग्रीचा वापर करत बॅटरी उत्पादन करण्याचा सल्ला दिला. देशात 25 कोटी बॅटरी लागणार असल्याचे मोठे सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे सुतोवाच करताना त्यांनी बॅटरीच्या किंमती कमी कशा होतील यावर ही उद्योजकांनी लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.

देशात बॅटरी उद्योगात यामुळे स्पर्धा निर्माण होणार असून इतक्या मोठ्या बॅटरी कशासाठी लागणार आहेत? याचे कारणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. क्लिन कुकिंग मूव्हमेंट अर्थात धुरापासून मुक्त स्वयंपाक घर अशी संकल्पना आज मोदींनी मांडली. या क्षेत्रातील उद्योजकांनी त्याचे स्वागत या टाळ्या वाजवून केले आहे. सूर्योदय योजनेत देशात एक कोटी घरांवर रुफ टाॅप सोलर लावण्यात येणार असून त्यासाठी मोठ्या संख्येत बॅटरीची गरज भासणार आहे. त्या रुफ टाॅप सोलरद्वारे चार्ज झालेल्या बॅटरीवर कुकिंग आणि गाड्यांचे चार्जिंग करण्याचा सल्ला आज PM Modi नी दिला.

PM Modi, Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : हिंमत असेल तर 'या' मतदारसंघात भाजपला हरवून दाखवा! ममतांचं काँग्रेसला आव्हान...

देशात बारा लाख इलेक्ट्रिक वाहने दरवर्षी विकली जात असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. या माध्यमातून सौर उर्जेवर आधारीत उद्योगासोबत आता बॅटरी उद्योगासाठी मोठी घोषणा मोदींनी केली. तर या मोबिलिटी संमेलनात तिसऱ्यांदा आपलेच सरकार केंद्रात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात मध्यम वर्गाचे उत्पन्न वाढले आहे. त्याच बरोबर 25 कोटी भारतीय हे बीपीएलच्यावर गेले आहेत. त्याचा सर्वाधिक फायदा वाहन उद्योगाला झाला आहे. देशात 2014 च्या पूर्वी देशात 12 कोटी वाहने विकली गेली. तर त्यानंतरच्या दहा वर्षात 21 कोटी वाहनांची विक्री झाल्याची माहिती मोदींनी दिली. देशात अटल टनेल ते अटल सेतूपर्यंत कुठलाच प्रोजेक्ट आता लटकत नाही आणि अटकला नाही, असे म्हणत केंद्रातील गतीमान सरकारचे उदाहरण त्यांनी दिले.

मध्यंतरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्रक ड्रायव्हर यांच्यासोबत प्रवास केल्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता मोदींनी देशातील मोठ्या संख्येत असलेल्या ड्रायव्हर व्यावसायिकांना दिलासा देण्याची घोषणा केली आहे. सर्व नॅशनल हायवेवर एक हजार ‘ड्रायव्हर भवन’ उभारण्याची घोषणा या मोबिलिटी एक्स्पोमध्ये करण्यात आली. या 'ड्रायव्हर भवन'मध्ये जेवण, पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग आणि मुख्य म्हणजे आराम करण्याची व्यवस्था असेल. त्यामुळे रस्ते अपघात कमी होण्याची ग्वाही मोदींनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीपूर्वी ट्रक आणि टॅक्सी चालकांसाठी ही मोठी घोषणा मोदींनी केली. केंद्र सरकार या योजनेवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या ड्रायव्हर प्रेमावर 'ड्रायव्हर भवन'च्या माध्यमातून हा मुद्दाच लोकसभा निवडणुकीपूर्वी हायजॅक केल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर गेल्या काळात नव्या कायद्याच्या विरोधात ट्रक ड्रायव्हर आंदोलनावरही यामुळे मलमपट्टी लावण्यात आल्याची चर्चा आहे.

मोदींनी जाहिर कार्यक्रमात टायर उद्योगाशी भांडण असल्याचे सांगितले. टायर उद्योगाने देशांतर्गत कच्चे रबर घेण्याचा आणि देशातील शेतकरी समृद्ध करण्याचा सल्ला टायर उत्पादक असोसिएशनला दिला. या माध्यमातून देशातील पैसा देशात राहील, असे आवाहन मोदींनी केले. देशात दक्षिणेतील रबर उत्पादक शेतकरी यांच्यासाठी मोठा दिलासा यातून मोदींनी दिल्याचे चित्र आहे.

edited by sachin fulpagare

PM Modi, Rahul Gandhi
Lok Sabha Election 2024 : अबकी बार 400 पार..! टीका करताना खर्गे हे काय बोलून गेले? मोदींनाही हसू आवरेना...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com