PM Modi At US : पॅलेस्टाईनच्या राष्ट्रध्यक्षांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, 'या' महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा

PM Modi Meets Palestinian President Mahmoud Abbas : मोदींनी यूएस दौऱ्यादरम्यान कुवेतचे क्राउन प्रिन्स शेख सबाह खालिद अल-हमद अल-सबाह तसेच नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचीही भेट घेतली.
PM Modi Meets Palestinian President
PM Modi Meets Palestinian PresidentSarkarnama
Published on
Updated on

PM Narendra Modi At US : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या न्युयॉर्क दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये द्विपक्षीय बैठक घेतली. गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असताना ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. यावेळी पीएम मोदींनी (Narendra Modi) गाझामधील परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. मोदींनी यावेळी कुवेतचे क्राउन प्रिन्स शेख सबाह खालिद अल-हमद अल-सबाह तसेच नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचीही भेट घेतली.

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीपूर्वी बैठक

पंतप्रधान मोदी आणि पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास (Mahmoud Abbas) यांच्यातील बैठक संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीपेक्षा वेगळी आहे. या बैठकीत पुन्हा एकदा पॅलेस्टाईनचा मुद्दा तापणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत अनेक देश आवाज उठवू शकतात. दरम्यान, इस्रायलने वेस्ट बँकमध्येही कारवाई तीव्र केली असून, त्यामुळे पॅलेस्टिनी प्रशासनासोबत तणाव वाढला आहे.

PM Modi Meets Palestinian President
Nitin Gadkari : आमची चौथ्यांदा येण्याची गॅरंटी नाही, पण..! नितीन गडकरी असं का म्हणाले?

मध्यपूर्वेत युद्धासारखी परिस्थिती

पॅलेस्टाईनसोबतच इस्रायल आणि लेबनीज अतिरेकी संघटना हिजबुल्ला यांच्यात युद्ध परिस्थिती निर्माण होत आहे. बेरूतमध्ये शुक्रवारी इस्रायली हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा सर्वोच्च कमांडर इब्राहिम अकील मारला गेला, त्यानंतर या गटाने इस्रायलवर रॉकेट आणि ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. या हल्लेखोरांचे म्हणणे आहे की त्यांनी इस्रायलशी थेट युद्ध सुरू केले आहे आणि "ज्यू राष्ट्रावर हल्ला" करण्याची धमकी दिली आहे.

PM Modi Meets Palestinian President
Youth Congress : राहुल गांधींनी बदलले युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष; 'या' नेत्याच्या नावावर केलं शिक्कामोर्तब

तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. शनिवारी, पंतप्रधान मोदी यांनी क्वाड समिटला हजेरी लावली आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांनी भारत-अमेरिका जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आढावा बैठक घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com