जो बायडन, पुतिन यांना मोदींनी मागे टाकले.. ओबामा पहिल्या क्रमांकावर

इम्रान खान प्रथमच या यादीत सामील झाले आहे. या यादीतील टॉप 20 मध्ये बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्याशिवाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे.
Narendra Modi
Narendra Moditwitter
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या (Most Admired Men 2021) 2021च्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे.

डेटा अॅनालिटिक्स कंपनी YouGov ने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी 38 देशांतील सुमारे 42,000 लोकांचा समावेश करण्यात आला होता.

ब्रिटीश मार्केट रिसर्च कंपनी YouGov ने जारी केलेल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि राजकीय व्यक्तींना मागे टाकून 8 व्या स्थानावर विराजमान केले आहे.

इम्रान खान प्रथमच या यादीत सामील झाले आहे. या यादीतील टॉप 20 मध्ये बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्याशिवाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे.

जगातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुषांच्या 2021 च्या यादीमध्ये, PM मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांसारख्या इतर राष्ट्रप्रमुखांच्या वर आहेत.

Narendra Modi
ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी फडणवीसच

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर आहेत.

केंद्रीय मंत्र्याला अडचणीत आणलेल्या तपासात एका मराठी अधिकाऱ्याचा हात

दिल्ली : लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष तपास पथकाने शेतकऱ्यांना चिरडण्याचा कट पुर्वनियोजीत असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या अहवालानंतर आता अजय मिश्रा यांची गच्छंती निश्चित मानली जात आहे. पक्षाकडून आज त्यांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले असून त्यांना राजीनामा देण्याचे आदेश असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळ पर्यंत त्यांचा राजीनामा निश्चित मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com