PM मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर; असा आहे भरगच्च कार्यक्रम

अफगाणिस्तान, सीमापार दहशतवाद, कट्टरता आणि सीमाभागातील अन्य मुद्यांवर चर्चा करण्याची शक्यता
Narendra Modi- joe Biden
Narendra Modi- joe Biden Sarkarnama

नवी दिल्ली : PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (२२ सप्टेंबर) अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान, पीएम मोदी 24 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. या बैठकीला अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस (Kamala Harris) देखील उपस्थित राहणार आहेत.

या दौऱ्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल. पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा 26 सप्टेंबरला संपणार आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची ही दुसरी भेट असेल. यापूर्वी जो बायडेन उपराष्ट्रपती असताना दोघांची भेट झाली होती.

Narendra Modi- joe Biden
हिवाळी अधिवेशनात २७ विधेयके चर्चेसाठी येणार

त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय बैठकी व्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील क्वाड समिटमध्ये सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त, पीएम मोदी व्यावसायिक संवाद आणि संयुक्त राष्ट्र महासभेलाही संबोधित करतील. अनेक नेत्यांना भेटण्याव्यतिरिक्त, ते व्यावसायिक बैठकीतही भाग घेतील.

असा असेल पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा

- 22 सप्टेंबर: वॉशिंग्टन डीसीमध्ये संध्याकाळी- राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या (भारतात 23 सप्टेंबर) कोविड -19 ग्लोबल समिटमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी होतील.

- 23 सप्टेंबर: व्हाईट हाऊसमध्ये उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबत बैठक. दोन्ही नेत्यांची ही पहिली औपचारिक बैठक असेल.

देशातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतील काही मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. त्यात अॅपलचे सीईओ टीम कुक यांचाही समावेश असेल.

तसेच ऑस्ट्रेलिया, जपान आणि ईव्ह या व्यावसायिक बैठकीला उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतील.

- 24 सप्टेंबर: सकाळी पंतप्रधान मोदी द्विपक्षीय बैठक आणि क्वाड समिटमध्ये सहभागी होतील.

25 सप्टेंबर: यूएन जनरल असेंब्ली (UNGA) च्या 76 व्या सत्रात पंतप्रधान मोदींचे भाषण स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता (IST संध्याकाळी 6:30 वाजता) होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या भेटीदरम्यान तीन परिषदांमध्ये सहभागी होतील. बायडेन यांनी कोरोनावर बोलाविलेल्या जागतिक बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील. याशिवाय द्विपक्षीय बैठकीत बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्त्वाची चर्चा होणार आहे. त्याचबरोबर जागतिक भागीदारी वाढवणे, व्यापार मजबूत करणे, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य, दहशतवाद आणि अफगाणिस्तान यांसारख्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com