PM Modi Visit Ramanathaswamy : अयोध्येत नव्हे तर 'या' मंदिरात मोदी आज करणार पूजा; मंदिराचे खास महत्व जाणून घ्या!

PM Modi to Worship at Ramanathaswamy Temple Today : पीएम मोदी यापूर्वी 20 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदीराच्या प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वी याच मंदीरात पूजेसाठी आले होते.
PM Modi to Worship at Ramanathaswamy Temple Today
SarkarnamaPM Modi to Worship at Ramanathaswamy Temple Today
Published on
Updated on

PM Modi Visit Ramanathaswamy : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्याहून परत येत आहेत. श्रीलंकेतून ते थेट तामिळनाडू येथे जाणार आहेत.

रामनवमीच्या निमित्ताने येथे 8,300 कोटी रुपयांच्या विविध योजनांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी के एका मंदिरात पूजा करणार आहेत. हे मंदिर भगवान शिवाच्या 12 ज्यौतिलिंगापैकी एक असून चार धामांमध्ये याचा समावेश आहे. या मंदिराचं रामायणाशी खास नातं आहे. ते काय हे जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदी आज दुपारी तामिळनाडूतील रामनाथस्वामी मंदिरात जाणार आहेत. येथे ते दर्शन आणि पूजा करणार आहेत. हे मंदिर रामायणाशी खास नातं सांगते. रावणाचा वध केल्यानंतर या मंदिरात ब्रह्यहत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी श्रीरामांनी शिवलिंगाची स्थापना केली होती. पीएम मोदी यापूर्वी 20 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदीराच्या प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वी याच मंदिरात पूजेसाठी आले होते.

PM Modi to Worship at Ramanathaswamy Temple Today
Maharashtra Government: तब्बल 21 वर्षांनंतर मिळाला न्याय! शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; सरकारचा मोठा निर्णय

न्यू पंबन रेल्वे पुलाचं उद्धघाटन

रामनाथ स्वामी मंदिरात पूजा करण्यापूर्वी मोदी तामिळनाडूच्या नागरिकांना योजनांच्या माध्यमातून अनेक भेट देणार आहेत. दुपारी बारा वाजता रामेश्वरम येथील न्यू पंबन रेल्वेचे उद्धघाटन करणार आहेत, यासाठी 700 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा देशातील पहिला समुद्रातीला व्हर्टिकल लिफ्ट पुल आहे.

नव्या रेल्वेला हिरवा कंदील

पीएम मोदी आपल्या दौऱ्यात रामेश्वरम आणि तांबरम (चेन्नई) दरम्यान धावणाऱ्या नव्या रेल्वेचा ग्रीन सिग्नल देणार आहेत. रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल भारतीय अभियांत्रिकीचं जागतिक स्तरावरील एक रोल मॉडेल आहे. या पुलाची लांबी 2.08 किमी आहे. यामध्ये 99 स्पॅन असून, 72.5 मीटरचा व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन आहे, जो 17 मीटर उंचीपर्यंत उचलला जाऊ शकतो.रामायणातील अख्यानानुसार रामेश्वरमच्या जवळच रामसेतूचे काम धनुषकोडीपासून सुरू झालं होतं.

या प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

  1. एनएच-332 वरील 29 किलोमीटर लांब विलुप्पुरम-पुडुचेरी विभागाचं चौपदरीकरण

  2. एनएच-40 वरील 28 किलोमीटर वालाजापेट-राणीपेट विभागाचं चौपदरीकरण,

  3. एनएच-32 वरील 57 किलोमीटर पूंडियनकुप्पम-सत्तनाथपुरम विभाग राष्ट्राला समर्पित

  4. एनएच-36 वरील 48 किलोमीटर चोलापुरम-तंजावूर विभाग राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहेत.

  5. हे महामार्ग अनेक तीर्थक्षेत्रांना आणि पर्यटन स्थळांना जोडतील, शहरांमधील अंतर कमी करतील,

  6. वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये, बंदरांपर्यंत जलद पोहोच शक्य करतील.

  7. स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादने जवळच्या बाजारात पोहोचवण्यास मदत करतील

  8. स्थानिक चामडे व लघुउद्योग क्षेत्रातील आर्थिक घडामोडींना चालना देतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com