PM Modi Birthday : ४० मिनिटांत '56 इंच मोदी जी' थाळी संपवा, मिळवा 8.5 लाखांचे बक्षीस

PM Modi Birthday : आज (शनिवारी) जन्मलेल्या मुलांना भेटवस्तू म्हणून सोन्याची नाणी वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
PM Narendra  Modi
PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi)यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने देशभर भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. दिल्लीतल्या एका हॉटेलने पंतप्रधान मोदींचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. तर तामिळनाडूमध्ये सोन्याची नाणी वाटण्यात येणार आहे. (pm narendra modi 72nd birthday updates)

दिल्लीतल्या कनॉट प्लेस (Delhi Connaught Place) इथं असलेल्या ARDOR 2.0 या हॉटेलने मोदीच्या वाढदिवसानिमित्त 56 व्यंजनांची स्पेशल थाळी केली आहे. पंतप्रधानांच्या वाढिदिवशी आज ही थाळी लाँच करण्यात आली. 10 दिवसांसाठी 56 इंची थाळी दिली जाईल.

आर्डोर 2.1 रेस्तराँचे मालक सुवित कालरा म्हणाले, " कॅनॉट प्लेसमध्ये असलेल्या आमच्या हॅाटेलमध्ये ही थाळी आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे चाहते आहोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 56 इंची थाळी देण्यात येत आहे. दोघांपैकी एकाने 40 मिनिटांत थाळी संपवली तर त्यांना 8.5 लाख रुपये दिले जातील,"

PM Narendra  Modi
Manikrao Gavit : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

"पंतप्रधान मोदी हे आपल्या देशाचा गौरव आहेत, त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी अनोखी भेट देण्याचा निश्चय केल आहे. यासाठी ही भव्य थाळी लाँच केली आहे. या थाळीला '56 इंच मोदीजी' थाळी असं नाव देण्यात आलं आहे,"असे कालरा यांनी सांगितले. मोदी 72 वर्षांचे झाले आहेत.

सोन्याची नाणी वाटणार

तर दुसरीकडे तामिळनाडूमधील भाजपने मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज (शनिवारी) जन्मलेल्या मुलांना भेटवस्तू म्हणून सोन्याची नाणी वाटण्याचा निर्णय घेतला आहे. नवजात बालकाला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक नाण्याचे वजन 2 ग्रॅम असेल.चेन्नईचे आरएसआरएम रुग्णालयात आज जन्मलेले मुले या नाण्याची लाभार्थी ठरणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून 15 दिवसांच्या आरोग्य अभियानाला कर्नाटक सरकारने सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com