अखेर लखीमपूर खीरी हत्याकांडावर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन

उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना कारखाली चिरडल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना कारखाली चिरडल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणात आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांना अटकही करण्यात आली. त्यानंतर मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी झाली. पण या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एकदाही बोलले नव्हते. अखेर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्याशिवाय त्यांनी मौन सोडलं. (UP Election 2022)

उत्तर प्रदेशात गुरूवारी पहिल्या टप्प्यातील मदतान होत आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी ANI ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना लखीमपूर खीरीबाबत प्रश्न विचारण्यात आला. अजय मिश्रा यांचा मुलगा या प्रकरणात ऑक्टोबर महिनयापासून तुरूंगात आहे. पण मिश्रा हे अजूनही मंत्रिमंडळात आहेत. या प्रकरणात भाजप दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हे आरोप मोदींनी फेटाळून लावले. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

Narendra Modi
UP Election Updates : आज पहिला टप्पा अन् योगी मतदारांना म्हणाले, चुक केली तर...!

त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, लखीमपूर प्रकरणात योगी सरकार पूर्ण पारदर्शकता ठेवत चौकशी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने जी गोष्ट मागितली किंवा कोणतीही बाब न दडवता योगी सरकारने त्याला संमती दिली आहे. न्यायालय जी समिती बनवू इच्छित होते, चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करू इच्छित होते, त्याला राज्य सरकारने संमती दिली. राज्य सरकार या प्रकरणात पारदर्शकपणे काम करत आहे, असे मोदींनी स्पष्ट केलं.

मुलाखतीवर युपी निवडणुकीचा प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पत्रकारांना किंवा माध्यमांशी थेट बोलत नाहीत. ट्विटर किंवा फेसबुक द्वारे ते थेट जनतेशी संवाद साधतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ते पत्रकारांना मुलाखती देत असल्याचे 2014 ते 2019 दरम्यान दिसले होते. आता मात्र उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांत निवडणुकीचा प्रचार जोरात असताना मोदी यांनी ANI ला मुलाखत दिली आहे. उत्तर प्रदेश जिंकणे भाजपसाठी महत्वाचे आहे. येथे अखिलेश यादव यांनी भाजपला मोठे आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. येथील निवडणुकीचा निकाल भाजपच्या विरोधात जाऊ नये म्हणून तर आता मोदींनी मुलाखत दिली नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे.

मोदी यांची पंतप्रधान म्हणून शेवटची मुलाखत ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या मतदानाच्या टप्प्याच्या वेळी झाली होती. त्यानंतर आता 2022 पर्यंत त्यांनी भारतातील पत्रकारांना राजकीय परिस्थितीविषयी मुलाखत देण्याचे टाळले. या वेळी मात्र त्यांनी आपला हा नियम बदलला आहे. त्यांनी उत्तर प्रदेश, गोवा आणि पंजाबमध्ये भाजपची येणार असल्याचा दावा केला. त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. अखिलेश यादव हे उद्धट असल्याचा आरोप करत ते इतके उद्धट आहेत की, त्यांनी याआधी 'गुजरात के दो गधे' असा उल्लेख केला होता. त्यानंतर यूपीने त्यांना धडा शिकवला आहे. आणखी एकेवेळी त्यांच्यासोबत 'दोन मुले आणि एक बुवाजी' त्यांच्यासोबत होत्या. मात्र, तरीही काही गणित जमलं नाही, अशी टीका मोदींनी अखिलेश यांच्यावर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com