Narendra Modi : मोदींच्या मंत्रीमंडळात शिंदे गटातील दोघांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार..

Modi Cabinet Reshuffle : शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याचे समजते.
Devendra Fadanvis, Prime minister Narendra Modi & Chief Minister Eknath Shinde
Devendra Fadanvis, Prime minister Narendra Modi & Chief Minister Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Modi Cabinet Reshuffle : मोदी सरकारमध्ये (pm Narendra Modi) मोठे फेरबदल होणार आहे. येत्या १५ जानेवारीच्या अगोदर मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचे विश्वनीय सुत्रांनी सांगितले. या मंत्रीमंडळातील फेरबदलापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. त्यासाठी मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक मागितले आहे. (Modi Cabinet Reshuffle news update)

कामात दिरंगाई करणाऱ्यांना डच्चू

२०२४ लोकसभा निवडणूकीपुर्वी मोदी मंत्रीमंडळातील लोकांची नाराजी असलेल्या आणि कामात दिरंगाई करणाऱ्या मंत्र्यांना मिळणार डच्चू मिळणार असल्याची विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी होणार आहे. त्यापूर्वी मंत्रीमंडळात फेरबदल करणे गरजेचे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पंधरा दिवसाचा कालावधी

फेरबदल झालेल्या मंत्र्यांना आपल्या कामाचे स्वरुप समजून घेण्यासाठी किमान पंधरा दिवसाचा कालावधी आवश्यक आहे. त्यासाठी नवीन मंत्र्यांना खात्याची माहिती तसेच अधिवेशनात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर समजून घेण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी मिळणे आवश्यक आहे.

या मंत्र्यांच्या खूर्चीला धक्का नाही..

मोदी सरकारमधील सध्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मनसुख मांडवीय, निर्मला सितारमन, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, स्मृती इराणी वगळता अन्य मंत्र्यांवर टांगती तलवार असल्याचे बोलले जाते.

ती दोन नावे कोणती?

मोदी सरकारच्या या फेरबदलात शिंदे गटालाही संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याचे समजते. शिंदे गटाच्या कोणत्या दोन जणांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे गुलदस्त्यात आहे.

५ राज्यांत सरकार वाचवायचे

या नवीन वर्षाध्ये ९ राज्यांत (मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगण, त्रिपुरा, मेघालय, नगालँड व मिझोराम) निवडणुका आहेत. यात जम्मू-काश्मीरला जोडल्यास आकडा १० होतो. या निवडणुकांसाठी भाजपने (bjp)या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. पण भाजपचा मार्गही सोपा नसला तरी २०२३ हे वर्ष भाजपसाठीही खास वर्ष आहे. कारण त्यांना ५ राज्यांत सरकार वाचवायचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com