पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; दीड वर्षात दहा लाख सरकारी नोकऱ्या देणार

देशातील बेरोजगारीच्या मुद्यावरून होत असलेल्या टीकेनंतर मोदींनी ही घोषणा केली आहे.
PM Narendra Modi Latest Marathi News
PM Narendra Modi Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून पुढील दीड वर्षात दहा लाख नोकऱ्या देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मिशन मोडवर सरकारी कर्मचारी भरती केली जावी, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभागांना दिले आहेत. विरोधकांसह पक्षातील काही नेत्यांकडून बेरोजगारीच्या मुद्यावर होत असलेल्या टीकेनंतर मोदी सरकारे हा निर्णय घेतला आहे. (PM Narendra Modi Latest Marathi News)

पंतप्रधान मोदींच्या घोषणेमुळे युवकांना व होतकरू लोकांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये आणि मंत्रालयामध्ये रोजगार मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्वीट केले. त्यानंतर काही वेळातच लष्करात ४-४ वर्षांसाठी युवकांची नवीन भरती करण्याबाबतच्या किंबहुना लष्करी भरती प्रक्रियेतच अमूलाग्र बदल आणणाऱया ‘अग्नीपथ' योजनेची घोषणा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केली आहे.

PM Narendra Modi Latest Marathi News
विद्यार्थ्याला असं तुरुंगात ठेवणं पवारांनाही आवडणार नाही! उच्च न्यायालयाचे खडे बोल

आगामी काळात गुजरात, मध्य प्रदेशासह ११ राज्यांतील विधानसभा निवडणुका व २०२४ च्या लोकसभा निवडणुकींच्या मिशन मोडमध्ये स्वतः सरकार आल्याचे द्योतक म्हणजे ताजी रोजगार निर्मिती घोषणा असल्याचे राजकीय जाणकार मानतात. पंतप्रधान मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातल्या मनुष्यबळाच्या स्थितीचा आढावा घेतल्यावर आदेश दिले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गेल्या वर्षी राज्यसभेत केंद्र सरकारमधील विविध विभागांतील रिक्त पदांची माहिती दिली होती. त्यानुसार १ मार्च २०२० पर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ८.७२ लाख पदे रिक्त आहेत. त्यामुळे आता हा आकडा साधारण १० लाखांच्या आसपास गेला असेल.

केंद्र सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकूण ४० लाख ४ हजार पदे आहेत, त्यापैकी सुमारे ३१ लाख ३२ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. २०२०-२१ मध्ये आरआरबीने २ लाख ०४ हजार ९४५ कर्मचाऱयांची नियुक्ती केली व यूपीएससीनेही २५ हजार २६७ उमेदवरांची निवड केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com