Narendra Modi Kashmir Speech : नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीरमध्ये भावनिक साद; भाषणातील 10 ठळक मुद्दे...

Narendra Modi Jammu & Kashmir Latest Speech : मी जम्मू-काश्मीरलाही माझे कुटुंब मानले आहे.
Narendra Modi Kashmir Speech
Narendra Modi Kashmir SpeechSarkarnama

Jammu & Kashmir News : 'जम्मू-काश्मीर हे माझे कुटुंब आहे, असे म्हणत श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर हजारो लोकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांच्या भावनेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मोदी म्हणाले, "आज एक नवे काश्मीर मला दिसत आहे, ज्याची आपण अनेक दशकांपासून वाट पाहत होतो. आज येथील निर्बंध संपले असून, लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत. त्यांचे हक्क परत केले जात आहेत." (Latest Marathi News)

Narendra Modi Kashmir Speech
BJP Political News : भाजपची मोठी खेळी; विरोधी पक्षालाच घेतलं सत्तेत, 13 आमदारांमुळे वाढली ताकद

नरेंद्र मोदी म्हणाले, 'स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीर राज्य घराणेशाहीच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. आज हे लोक म्हणतात की, मोदींना कुटुंब नाही, पण संपूर्ण देश त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक म्हणत आहेत, मी मोदींचा परिवार आहे. मी जम्मू-काश्मीरलाही माझे कुटुंब मानले आहे. पुढील 5 वर्षांत जम्मू-काश्मीरचा अधिक वेगाने विकास होईल. शांतता आणि उपासनेचा प्रतीक असणारा रमजान महिना काही दिवसांत सुरू होणार आहे. जम्मू-काश्मीरमधून मी संपूर्ण देशाला रमजानच्या शुभेच्छा देतो."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधानांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे...

1. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या लोकांना आता अधिकार मिळत आहेत. येथे कलम 370 रद्द केल्यावर पाकिस्तानातील विस्थापित लोक आणि पीडित कुटुंबांना आता त्यांचे हक्क मिळत आहेत.

2. कुटुंबावर आधारित घराणेशाहीच्या पक्षांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांना त्यांच्या हक्कांपासून अनेक दशकांपासून वंचित ठेवले. आज प्रत्येक वर्गाला आपले हक्क कळले आहेत. आता इथे तसेच संपूर्ण देशात प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी होत आहे.

3. जम्मू-काश्मीर हा केवळ एक प्रदेश, एक राज्य नसून देशाचे प्रमुख अंग आहे. देशाचे मस्तक उंच असावे. त्यामुळे येथील विकासाला सर्वाधिक महत्त्व आहे.

Narendra Modi Kashmir Speech
BJP Political News : मोदी- शाहांचं विशेष 'विदर्भ प्रेम' पण गडकरींशिवाय...

4. जम्मू काश्मीरमधील बँकांमध्ये काही लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना भरले अन् ती डबगाईला आणली. गरिबांचे पैसे बुडत होते. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. लोकांना नफा मिळत आहे. आपल्या विकासाचा, सुधारणांचा परिणाम दिसून येत आहे.

5. काही दिवसांनी रमजानचा महिना सुरू होत आहे. शांती आणि उपासनेच्या सणाच्या सर्व लोकांना शुभेच्छा.

6. शंकराचार्यांचा उल्लेख करून त्यांनी सांगितले की, ही जम्मू काश्मीर त्यांची भूमी आहे. उद्या महाशिवरात्री आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.

7. पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) त्यांच्या भेटीदरम्यान जम्मू-काश्मीरसाठी 6400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले.

8. मोदी म्हणाले की, आज जम्मू-काश्मीरमधील लोक म्हणत आहेत की, आम्हीही मोदींचे कुटुंब आहोत. मी नेहमीच जम्मू-काश्मीरला माझे कुटुंब मानले आहे. कुटुंबातील सदस्य नेहमी सहृदयी आहेत.

9. आज येथे कुटुंबाभिमुख लोकांची, घराणेशाही चालवणाऱ्या लोकांची दुकाने बंद करण्याचा निर्णय लोकांनी केला आहे.

त्यांनी पसरवलेले भ्रमही संपले आहेत.

10. मोदी म्हणाले, हे एक नवीन युग आहे. या काश्मीरसाठी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले होते. आज ते नवे काश्मीर समोर आहे, ज्याची अनेक दशकांपासून प्रतीक्षा होती.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com