New Delhi : अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला दिलेले सडेतोड उत्तर, मणिपूर हिंसाचारावरून सभागृहात झालेला गदारोळ, लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचे निंलबनावरुन गाजलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे आज (शुक्रवारी) सूप वाजणार आहे.
वीस जुलैपासून सुरू झालेले अधिवेशन आज संपणार आहे. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने अनेक वेळा कामकाज बंद पाडले. अविश्वास प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचे गुरुवारी निलंबन करण्यात आले आहे. "धृतराष्ट्र आंधळा होता, आजही राजा आंधळाच आहे. मणिपूर आणि हस्तिनापूरमध्ये फरक नाही. नरेंद्र मोदी नीरव मोदीसारखे शांत बसले आहेत. भाजपने मणिपूरच्या खासदाराला संसदेत बोलण्याची संधी दिली नाही,' असे विधान अधिरंजन चौधरी यांनी केले आहे.
अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावरून संसदेत चांगलाच गदारोळ झाला. मणिपूरच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.विरोधी पक्षाचे नेते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांच्या निलंबनाबाबत चर्चा करणार आहेत. सोनिया गांधी यांनी लोकसभेतील काँग्रेस खासदारांची बैठक बोलवली आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. आज (शुक्रवारी) सकाळी साडेअकरा वाजता लोकसभेचे कामकाज संपणार आहे.
अनेक महत्त्वाची विधेयक या अधिवेशन काळात मंजूर करून घेतली, त्यात दिल्ली सेवा विधेयक हे महत्वाचे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोध करण्यासाठी आपने जोरदार तयारी केली होती. त्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधली होती. अधिवेशन काळात लोकसभेत गोंधळामुळे दोन खासदारांना निलंबित केले करण्यात आले, तर राज्यसभेत देखील दोन खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
मोदी सरकारविरोधातील हा दुसरा अविश्वास ठराव होता. पहिला 20 जुलै 2018 रोजी तेलगू देसम पक्षाने आणला होता. 12 तासांच्या चर्चेनंतर मोदी सरकारला 325 मते मिळाली. विरोधकांना 126 मते मिळाली. आतापर्यंत 27 वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. चीन युद्धानंतर 1963 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नेहरू सरकारविरोधात पहिला प्रस्ताव आणण्यात आला होता.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.