PM Narendra Modi : 'स्वातंत्र्यानंतर देश अपेक्षित गती पकडू शकला नाही, 12 वर्षांत...', PM मोदींनी लाल किल्ल्यावरून ती खंत बोलून दाखवली

PM Modi Independence Day Speech : २००४ ते २०१४ दरम्यान ३५० पेक्षा कमी विद्यापीठे होती, तर गेल्या १०-१२ वर्षांत ६५० नवीन विद्यापीठे जोडली गेली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
PM Modi Independence Day Speech
PM Modi Independence Day Speechsarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : आपण अपेक्षित गती व वेग पकडू शकलो नाही . होते, चालते, होईल, पाहिले जाईल, या मानसिकतेतच आपण अडकून राहिलो. २०१४ पर्यंत संपूर्ण जगाने भारताला कमकुवत पाच अर्थव्यवस्थांचा गटमध्ये ढकलले होते.गेल्या १२ वर्षांत भारताने नवीन वेग पकडला असून देश वेगाने पुढे जात आहे.आता १४० कोटी देशवासीयांचा संकल्प आणि सामर्थ्य रोखणे अशक्य आहे.

पुढ बोलताना ते म्हणाले,विकास हा केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित न राहता सर्वसमावेशक असायला हवा. येत्या दशकात फॉरच्युन ५०० मधील किमान ५० कंपन्या भारतीय असाव्यात जगातील पहिल्या ५ बँकांमध्ये आणि अव्वल फार्मा कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा समावेश असावा.जागतिक स्तरावर लॉ फर्म्स, रेटिंग एजन्सी, अकाउंटिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे नेतृत्व असावे.

नियम व धोरणांमधील सुधारणा

२०२४-२०४७ च्या लक्ष्यानुसार जुने नियम बदलून नवीन काळाच्या गरजांनुसार नीती-नियम तयार करावे लागतील. सुधारणा (Reforms) या कोणत्याही सक्तीने नाही, तर दृढ विश्वासाने (Conviction) केल्या जात आहेत.

PM Modi Independence Day Speech
PM Modi Bandhej Pagdi: PM मोदींची बंधेज पगडी अन् पांढरा कुर्ता-पायजमा! काय आहे ‘बंधेज’ कला? लाल रंगाचा खास अर्थ

युवकांसाठी धोरण

विकसित भारताचा सर्वात मोठा लाभार्थी आणि साधक हा देशातील युवा आहे. देशात २.५ लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत. इनोव्हेशनसाठी केंद्र सरकारने १ लाख कोटी रुपयांचा निधी घोषित केला आहे. २००४ ते २०१४ दरम्यान ३५० पेक्षा कमी विद्यापीठे होती, तर गेल्या १०-१२ वर्षांत ६५० नवीन विद्यापीठे जोडली गेली आहेत. मेडिकलच्या जागा ४०० वरून सुमारे ८५० च्या आसपास झाल्या आहेत.

PM Modi Independence Day Speech
PM Modi Independence Day Speech: २०४७ पर्यंत भारत विकसित देश बनणारच!'; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हुंकार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com