कोलंबो : श्रीलंकेतील (Sri Lanka) तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून तिथे गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी गुरूवारी ज्येष्ठ नेते रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. सोमवारी (9 मे) महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. (Sri Lanka Crisis Latest Marathi News)
श्रीलंकेतील 225 सदस्यीय संसदेत विक्रमेसिंघे यांच्या यूनायटेड नॅशनल पक्षाकडे (UNP) सध्या केवळ एकच जागा आहे. पण यापूर्वी ते देशाचे चारवेळा पंतप्रधान होते. त्यांना ऑक्टोबर 2018 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी पदावरून हटवलं होतं. त्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा पद बहाल करण्यात आले. (PM Narendra Modi thanked by Sri Lankan PM Ranil Wickremesinghe)
73 वर्षीय विक्रमसिंघे यांचा पक्ष यांचा पक्ष देशातील सर्वात जुना आहे. पण 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला केवळ एकच जागा मिळाली आहे. त्यांच्या पक्षात फुट पडल्याने ही स्थिती ओढावली होती. युएनपीमधून फुटलेल्या नेते सध्या प्रमुख विरोधी पक्षात आहेत.
दरम्यान, विक्रमसिंघे यांना राष्ट्रपतींनी गुरूवारी पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षानेही विक्रमसिंघे यांना पाठिंबा दिल्याचे समजते. आता येत्या 17 मे रोजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्याविरूध्दच्या अविश्वास ठरावावर चर्चा होणार आहे.
पंतप्रधान मोदींचे मानले आभार
दरम्यान, पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानले. सध्या आर्थिक संकटात भारताकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. ते म्हणाले, 'मला भारतासोबत राजकीय चांगले संबंध हवे आहेत. मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो.' बहुमत सिध्द करण्याची वेळ आल्यानंतर आपण तेही करू, असंही विक्रमसिंघे म्हणाले आहेत.
श्रीलंकेत आगडोंब
दरम्यान, श्रीलंकेत सरकारविरोधी आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. राष्ट्रपतींच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर हल्ले करण्यासाठी कैद्यांचा वापर करण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. यामुळे जनतेतील सरकारबद्दलचा रोष आणखी वाढला आहे. या प्रकरणी अखेर कारागृह प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
अध्यक्ष राजपक्ष यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर हल्ले करण्यात आले होते. या हल्लेखोरांमध्ये तुरुंगातील कैद्यांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीलंका कारागृह प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. महिंदा राजपक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात नऊ जण ठार तर दोनशेपेक्षा अधिक जखमी झाले. कारागृह आयुक्त तुषारा उपुलदेनिया यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.