मेरठ : उत्तरप्रदेशमध्ये (Uttarpradesh) निवडणुकांची लगबग सुरु झाली आहे. या वर्षात होत असलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि समाजवादी पक्षही संपुर्ण ताकदीनिशी उतरला आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याही उत्तरप्रदेश दौऱ्यात वाढ झाली असून आचारसंहितेपुर्वी उद्घाटनांचा आणि लोकार्पण सोहळ्याचा धडका सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी मागच्या महिन्यात काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोअरचे लोकार्पण केल्यानंतर ते मेरठमध्ये आज राज्यातील पहिल्या मेजर ध्यानचंद क्रिडा विद्यापीठाची (Mejor Dhyanchand Sports university) पायाभरणी करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी मेरठमध्ये तीन तास थांबणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार दुपारी १ ते २.३० या वेळेत मेरठमधील सलावा गावाच्या परिसरात मेजर ध्यानचंद क्रिडा विद्यापीठाचा पायाभरणी सोहळा पार पडणार आहे. हे विद्यापीठ तयार करण्यासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या पायाभरणी सोहळ्यानंतर पंतप्रधान ३२ खेळाडूंशीही संवाद साधणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी २.४५ वाजता सलवा येथील हेलिपॅडवरून दिल्लीला रवाना होतील.
क्रिडा विद्यापीठाच्या पायाभरणी सोहळ्याला उत्तरप्रदेशातील २५ जिल्ह्यांमधील १६ हजार ८५० खेळाडूंना आमंत्रण देण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळाला स्टेडियमसारखे स्वरूप देण्यात आले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह मुझफ्फरनगर आणि मेरठचे खासदार, आमदार आणि लाभार्थी तसेच जवळपासच्या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.