धक्कादायक : मोदी म्हणाले, बेटी बचाव, बेटी पटाव,’ नेटकऱ्यांचा हल्लाबोल

मोदींनी चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्यानं या कार्यक्रमात चुकीचा संदेश गेला. याचा व्हिडिओ काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी टि्वट केला केला आहे.
  Narendra Modi
Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे विशेष भाषण दिले. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्दे उपस्थित केले. पण त्यांच्या भाषणापेक्षा यावेळी त्यांच्या टेलीप्रॉम्टरमध्ये (Teleprompter) काहीतरी तांत्रिक अडचण आल्याने त्यांच्या भाषणात गोंधळ उडाला. पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले.

मोदींचा हा व्हिडिओ विरोधकांनी समाजमाध्यमांवर शेअर करीत मोदींना ट्रोल केलं. त्यानंतर मोदींचा असाच एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या टेलीप्रॉम्टरची चर्चा सुरु असताना मोदींनी एका कार्यक्रमात चुकीची घोषणा केली, त्यानंतर त्यांच्यावर समाजमाध्यमावरुन टीका होत आहे.

मोदी (prime minister narendra modi) या कार्यक्रमात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’असे म्हटलं. मोदींनी चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्यानं या कार्यक्रमात चुकीचा संदेश गेला. याचा व्हिडिओ काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी टि्वट केला केला आहे. मोदीजी, थोडी तरी लाज ठेवा,’ असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

  Narendra Modi
लाडका भाचा स्वर्णवची भेट अपूर्णच ; आत्याचा अपघाती मृत्यू

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी इतिहासातील अनेक उदाहरणे दिली. मात्र, एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“अनेक कठीण प्रसंगांनी भरलेल्या मध्ययुगीन काळातही या देशात पन्नाध्याय, मीराबाईसारख्या थोर स्त्रिया होत्या. आणि अमृत महोत्सवात देशाच्या ज्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची आपण आठवण करतोय, त्यातही अनेक महिलांनी बलिदान दिले आहे. राणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या वीरांगना झलकारीबाईपासून ते अहल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्षेत्रात भारताची अस्मिता जपली,” असे मोदी यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com