PMC Bank Scam: मुख्य आरोपीचा डाव फसला, नेपाळ सीमेपासून अवघ्या 200 मीटर अलिकडे पकडले

आरोपी दलजीतसिंग बल (Daljit singh Bal) हा गेल्या काही महिन्यापासून सातत्याने पोलिसांना (Mumbai Police) गुंगारा देत होता.
PCB Bank Scam Daljit singh Bal
PCB Bank Scam Daljit singh BalSarkarnama

बिहार : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दलजीतसिंग बल (Daljit singh Bal) याच्या गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस मागावर होते. अखेर त्याला देशाबाहेर पळून जात असतांना पकडण्यात आले असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. महाराष्ट्रातील ४ हजरा ३५५ कोटींच्या पीएमसी बँक घोटाळा (PMC Bank Scam) प्रकरणात दलजीतसिंग बल हा मुख्य आरोपी आहे. आज (ता.3 फेब्रुवारी) नेपाळमार्गे (Nepal Border) कॅनडात जाण्याचा त्याचा डाव उधळला असून त्याला बिहारमधील (Bihar) पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सौल सीमेजवळ अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणाचा तपास करत असून दलजीतच्या अटकेबाबत मुंबई पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे.

PCB Bank Scam Daljit singh Bal
भारताची खोडी काढून चीन तोंडघशी; अमेरिकेने थेट तंबीच दिली

दलजीतसिंग हा पीएमसी बँकेचा (पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक) संचालक असून ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्यात तो मुख्य आरोपी आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा दलजीतच्या मागावर होती. त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस सुद्धा काढण्यात आली होती. अखेर त्याच्या नेपाळ मार्गे भारतातून पळून जाण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरले असून त्याला नेपाळच्या हद्दीपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर अलिकडेच इमिग्रेशन विभागाकडून अटक केली असून त्याला सध्या रक्सौल पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आली आहे. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पाटण्याला दाखल झाले असून रक्सौल येथून दलजीसिंगला ताब्यात घेणार असल्याचे समजते.

PCB Bank Scam Daljit singh Bal
''मैं जिंदा हूं' असं म्हणणाऱ्या 'मृत' उमेदवाराचा अर्ज रद्द

करोडोचे घोटाळे करून देशाबाहेर पळून जाणाऱ्या नीरव मोदी, विजय मल्ल्याप्रमाणेच दलजीसिंगही देश सोडून नेपाळमार्गे कॅनडात जाण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे ही माहिती तातडीने सर्व संबंधित विभागांना देण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातून नेपाळ सीमेपर्यंत पोहचलेला दलजीतला भारताच्या हद्दीतच पकडला गेला आहे. दरम्यान, पीएमसी बँक घोटाळा २०१९ मध्ये उघडकीस आला होता. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस दलजीतसिंग बल याच्या मागावर होते. दलजीत सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता. याबाबत सर्व यंत्रणांनाही अलर्ट करण्यात आले होते. मात्र, आज पोलिस यत्रंणेस यश आले असून दलजीतसिंगला पकडण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com