मुंबई : केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयच्या (CBI) हाताला मोठे यश लागले आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्यातील (PNB Scam) मुख्य आणि फरार आरोपी नीरव मोदी याचा (Nirav Modi) जवळचा सहकारी सुभाष शंकर परब (Subhash Shankar Parab) याला इजिप्तची राजधानी कैरो येथे बेड्या घालण्यात आल्या आहे. तसेच आज सकाळी त्याला विशेष विमानाने मुंबईमध्येही आणण्यात आले आहे. (Nirav Modi PNB Scam News Updates)
सुभाष शंकर परब (४९ वर्ष) हा नीरव मोदी याचा सर्वात जवळचा सहकारी आणि डीजीएम होता. २०१८ साली पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटींहून अधिकचा घोटाळा समोर आल्यानंतर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी याच्यासह तो भारतातून पळून गेला होता. त्यानंतर इंटरपोलने २०१८ साली या सर्वांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर सीबीआय मोदी, चोक्सीसह शंकर याच्या मागावर होती.
दरम्यान आता सुभाष शंकर परब याला कैरोहून मुंबईत आणण्यात आले असून सीबीआयने त्याला अटक केली आहे. मुंबई न्यायालयात हजर केल्यानंतर सीबीआय पीएनबी घोटाळा चौकशीसाठी त्याची कोठडी घेणार आहे दुपारी बाराच्या सुमारास सुभाषला मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.