Opposition Parties Meeting : 'INDIA 'नावावरुन वाद ; २६ विरोधी पक्षांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

I.N.D.I.A News : ‘इंडिया’ हे नाव कसे काय दिले जाऊ शकते? असा प्रश्न नितीश कुमार यांनी बैठकीतच उपस्थित केला आहे.
I.N.D.I.A  News
I.N.D.I.A News Sarkarnama
Published on
Updated on

Police Complaint Against 26 Opposition Parties : पाटणा येथे विरोधकांची पहिली बैठक पार पडली होती. त्यानंतर १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे दुसरी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसकडून विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ INDIA (Indian National Developmental Inclusive Alliance) असे नाव देण्यात आले. या नावाला विरोध करीत आता २६ पक्षाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

I.N.D.I.A (Indian National Developmental Inclusive Alliance) या नावाला विरोध करीत दिल्लीच्या बाराखंभा रोड पोलीस ठाण्यात डाँ. अविनाश मिश्रा यांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिश्रा यांनी या २६ पक्षावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षानी 'इंडिया'ने नाव वापरुन कायद्याचे उल्लघंन केल्याचे मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. विरोधी पक्षानी त्यांच्या आघाडी हे नाव ठेवल्यानं नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे मिश्रा यांचे म्हणणं आहे.

I.N.D.I.A  News
Irshalwadi Landslide Incident: इर्शाळवाडीवर दरड कोसळली ; शंभरहून अधिक लोक अडकल्याची भीती; दहा जणांचा मृत्यू

तर दुसरीकडे ‘इंडिया’या नावावरुन आता विरोधी पक्षामध्ये वाद निर्माण झाला आहे. कारण राजकीय पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ हे नाव कसे काय दिले जाऊ शकते? असा प्रश्न नितीश कुमार यांनी बैठकीतच उपस्थित केला आहे.

या बैठकीत काँग्रेसकडून विरोधकांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले. या नावाला नितीश कुमार यांनी कडाडून विरोध केल्याने विरोधकांच्या आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

I.N.D.I.A  News
Maharashtra Monsoon Session : पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर अत्याचार ; तनपुरेंच्या लक्षवेधीची फडणवीसांकडून दखल ; बडतर्फ करणार..

जनता दल (युनायटेड) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह म्हणाले, "विरोधकांची एकजूट २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करील. नितीश कुमार यांनीच विरोधकांना एकत्र आणण्यासाठी सर्वांत आधी प्रयत्न केले. त्यामुळेच विरोधकांची संख्या एवढी मोठी होऊ शकली. ते रागावू शकत नाहीत,"

विरोधकांची एकजूट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एनडीएची बैठक बोलावली.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या आघाडीला घाबरले आहेत. त्यामुळेच विरोधकांची बैठक झाल्यानंतर एनडीएकडून ३८ पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे, असे विरोधी पक्षाचे मत आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com