नवाब मलिकांच्या विरोधात दिल्लीकर रस्त्यावर, पोस्टरबाजी करून वानखेडेंना पाठिंबा

एनसीबीच्या मुख्यालय समोर येऊन पोस्टर्स झळकवून त्यांनी वानखेडेंच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले आहे.
posters for sameer Wankhede
posters for sameer WankhedeSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Samir Wankhede) यांच्यावर सातत्याने नव-नवीन आरोप होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे समीर वानखेडे यांच्याबाबत सातत्याने वेगवेगळे दावे करुन खळबळ उडवून देत आहेत. मात्र सध्या याच मुद्दावरुन आता लोक आणि विविध संघटना देखील रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ आणि नवाब मलिकांच्या विरोधात दिल्लीकर देखील रस्त्यावर उतरले आहेत. आकेपुरम परिसरातील एनसीबीच्या मुख्यालय समोर येऊन पोस्टर्स झळकवून त्यांनी वानखेडेंच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले आहे.

एनसीबीच्या मुख्यालय समोर येऊन पोस्टर्स झळकवून त्यांनी वानखेडेंच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले आहे.
एनसीबीच्या मुख्यालय समोर येऊन पोस्टर्स झळकवून त्यांनी वानखेडेंच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले आहे. Sarkarnama

या पोस्टर्सवर Say No Drugs असे म्हणत ड्रग्ज रॅकेटचा बीमोड करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात सुशांतसिंग राजपुतचे देखील फोटो दिसून येत आहेत. तसेच हिंदू सेनेने ही दिल्‍लीत एनसीबीच्या मुख्यालय समोर पोस्टर्स झळकवत समीर वानखेडेंना पाठिंबा दिला आहे.

posters for sameer Wankhede
अशी झाली डील; समीर वानखेडेंना 'आठ' तर गोसावी व सॅमला 'दहा' जाणार होते!

प्रभाकरने साईलचे आरोप आणि समीर वानखेडेंची धावपळ

किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने (Prabhakar Saeel) एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, आर्यनला ताब्यात घेतेल त्या रात्री आम्ही एनसीबीच्या कार्यालयाकडून लोअर परेलच्या दिशेने गेलो. तिथे एका पुलाखाली आमची गाडी थांबली. आमच्यामागे निळ्या रंगाची मर्सिडीज थांबली. त्या गाडीत एसआरकेची मॅनेजर होती. त्यानंतर गोसावी व सॅम सोबत त्यांची मिटींग झाली. त्यामध्ये काय झाले ते त्यावेळी मला कळलं नाही. पण गाडीतून त्यांनी परत फोन केला. 25 चा बाँड टाक, लास्ट 18 ला कर. कारण 8 समीर वानखेडेंना जाणार आहेत. आणि 10 आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असं ठरल्याचं प्रभाकर याने म्हटलं आहे. हे आकडे कोटींमध्ये असल्याची चर्चा आहे.

प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत आपल्यावर कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली आहे. त्यानंतर एनडीपीएस न्यायालयातही प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. सोमवारी रात्री त्यांनी दिल्लीही गाठली. एनसीबीच्या दक्षता समितीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

posters for sameer Wankhede
आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा असाही फंडा.. घातला अनेकांना गंडा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com