बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने (Kangna Ranout) स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी नवी पोस्ट करुन तिने वाद ओढवला आहे. या पोस्टमध्ये तिने शीख समुदायाबाबत वादग्रस्त विधान करत त्यांना खलिस्तांनी म्हटले आहे. तिच्या या पोस्टनंतर पंजाबमधील (Punjab) शिरोमणी अकाली दलाने (Shiromani Akali Dal) कंगनावर गुन्हा दाखल केला आहे.
कंगनाने काल आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. “खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असले तरी त्यांनी एका महिलेला नेहमीच लक्षात ठेवावं. देशाच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी त्यांना आपल्या चप्पलेखाली चिरडलं होतं. त्यांच्यामुळे या देशाला किती सहन करावं लागलं ते महत्त्वाचं नाही.पण त्यांनी खलिस्तान्याना डासांप्रमाणे चपलेखाली चिरडंल. पण त्यांनी देशाचे तुकडे होऊ दिले नाही. त्यांच्या निधनानंतरही हे लोक त्यांच्या नावानेच कापतात. त्यांना असाच गुरू हवा," अशी पोस्ट तिने केली होती. तिच्या या पोस्टनंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
तर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनेही कंगनाच्या विरोधात एक निवेदन जारी करत तिचा निषेध केला आहे. दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत असताना तिने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला खलिस्तानी आंदोलन म्हणून टिका केली होती. कंगनाने देशातील शीख समुदायातील शेतकऱ्यांना खलिस्तानी संबोधत शीख समुदायाचा अपमान केला असल्याचे समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दिल्लीतील मंदिर मार्ग पोलिस स्टेशनच्या सायबर सेलमध्ये कंगना विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याचशिवाय कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आणखी एक फोटो शेअर करत इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये “देशात खलिस्तानी चळवळीचा उदय होत असताना इंदिरा गांधी यांची गोष्ट याआधी पेक्षा अधिक प्रासंगिक होत आहे, असे लिहीले आहे. याचबरोबर, लवकरच तुमच्यासाठी आणीबाणी आणत आहे, असेही कंगनाने म्हटले आहे.
कंगना राणावत सध्या इमर्जन्सी नावाच्या चित्रपटासाठी काम करत आहे, त्यामुळे इंस्टाग्राम स्टोरीने अप्रत्यक्षपणे तिने या चित्रपटाचे देखील संकेत दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.