
Delhi News: काँग्रेसच्यावतीने माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मारकाची मागणी होत असताना, केंद्र सरकारने आधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचे स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. एक जानेवारी रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाने प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली.
खरंतर कोणत्याही मागणीशिवाय सरकारद्वारे स्मारक बनवण्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त करत, शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेवून याबद्दल आभार मानले आहेत. विशेष बाब म्हणजे मोदी सरकारने 2019मध्येच प्रणव मुखर्जी यांना देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान 'भारतरत्नट प्रदान केलेला आहे.
प्राप्त माहितीनुसार राजघाट जवळ बनवण्यात आलेल्या राष्ट्रीय स्मृतिस्थळात प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या स्मारकासाठी जागा निवडण्यात आलेली आहे. यानंतर मग शर्मिष्ठा मुखर्जी यांना याबाबत कळवण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती बनण्याच्या आधी इंदिरा गांधीपासून ते मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये महत्त्वपूर्ण मंत्रालयांचे ते मंत्री राहिले होते.
विशेष बाब म्हणजे शर्मिष्ठा मुखर्जी आपले वडील प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसमध्ये (Congress) योग्य सन्मान नाही दिला गेल्याचे म्हणत, मागील काही काळापासून सातत्याने नाराजी व्यक्त करत आहेत. तर राष्ट्रपती बनल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी अनेकदा पंतप्रधान मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीचे आणि तळमळीचे कौतुक केले होते.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या वडिलांच्या स्मारकाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना म्हटले की, यामुळे होत असलेला आनंद मला शब्दात सांगता येणार नाही. त्यांच्यामते ही पंतप्रधान मोदींची उदारता आणि मोठेपण आहे, की त्यांनी कोणत्याही मागणीशिवाय माजी राष्ट्रपतींचे स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.