Doordarshan New Logo : 'प्रसारभारती आता 'प्रचारभारती' ; दूरदर्शनाचा लोगो भगवा झाल्यावरून विरोधकांची टीका!

Jitendra Awhad : 'हा नवा अवतार आणि बातम्यांचा नवा प्रवास लोकशाहीच्या मुळावर उठला आहे.' असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
Doordarshan New Logo
Doordarshan New LogoSarakarnama

Doordarshan New Logo and Politics : पब्लिक ब्रॉडकास्ट दूरदर्शने आपल्या ऐतिहासिक लोगोमध्ये बदल केला आहे. आता दूरदर्शनाचा लोगो लाल न राहता भगव्या रंगाचा झाला आहे. या संदर्भात डीडी न्यूजच्या अधिकृत एक्स हॅण्डलरवरून घोषणाही करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, दूरदर्शनच्या लोगोमध्ये झालेल्या या बदलाकडे राजकीयदृष्ट्या पाहीलं जात आहे. शिवाय यावरून विरोधकाही आक्रमक झाले असून मोदी सरकारवर टीका करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'प्रसारभारती' आता 'प्रचारभारती' झाली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत भाजप आपला डाव साधू इच्छितोय. प्रत्येक गोष्टीचे भगवेकरण करून त्याचा दर्जा सुधारणार नाही, हे यांना कधी समजणार कोण जाणे. हा नवा अवतार आणि बातम्यांचा नवा प्रवास लोकशाहीच्या मुळावर उठला आहे. नवा अवतार सादर करतानाची जाहीरात करतानासुद्धा त्याची स्क्रिप्ट भाजप कार्यालयाने दिल्यासारखी वाटते.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Doordarshan New Logo
Prakash Ambedkar : 'मोदी हे पंतप्रधान असणं देशासाठी लाभदायक नाही, ते मुख्यमंत्री होते तेव्हा..' ; प्रकाश आंबेडकरांचं विधान!

तसेच, 'डीडीच्या लोगोमधील पृथ्वीचे रंगीबेरंगी सुंदर रूपदेखील यांनी भगवे करून टाकले आहे. जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आणि जगाने आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन ही मंडळी संकुचित करायला निघाली आहेत. याला वेळीच आळा घालायला पाहिजे.' असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने आरोप केला आहे की, दूरदर्शनच्या लोगोचा रंग बदलने सरकारी संस्थांवर कब्जा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे पाऊल नक्कीच भारताच्या पब्लिक ब्रॉडकास्टरच्या तटस्थतेला आणि विश्वासार्हतेस कमकुवत करत आहे.

Doordarshan New Logo
Chandrasekhar Bawankule : 'महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर..' ; उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंचा पलटवार!

याशिवाय मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर असे करून आचार संहितेचा भंग केला आहे. अशी तक्रार तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली असून, कारवाईचीही मागणी केली आहे. आता प्रसार भारती ही प्रचार भारती झाली, असे तृणमूलचे खासदार आणि संस्थेचे माजी सीईओ जवाहर सरकार यांनी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com