Presidential Election: शरद पवारांना राजनाथ सिंह यांचा फोन; उमेदवारीबाबत चाचपणी

विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत राजनाथ यांनी चर्चा सुरु केल्याचं वृत्त आहे.
Sharad Pawar News, Rajnath Singh News, Presidential Election 2022 News
Sharad Pawar News, Rajnath Singh News, Presidential Election 2022 Newssarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) सर्वसहमतीचा उमेदवार ठरविण्याची जबाबदारी भाजपने पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh)यांच्यावर सोपवली आहे. हे दोन्ही नेत्यांवर राजकीय पक्षांशी बोलण्याची जबाबदारी आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह हे सध्या सर्वानुमते योग्य उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी करत आहेत. (Presidential Election 2022 latest news)

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसहमतीचा उमेदवार ठरविण्याच्या प्रयत्नात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची त्यांच्या घरी भेट घेणार आहेत. बहुसंख्य पक्षांचा पाठिंबा असलेल्या या पदासाठी असाच उमेदवार निश्चित करावा, अशी भाजपची इच्छा आहे. (Sharad Pawar News)

विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत राजनाथ यांनी चर्चा सुरु केल्याचं वृत्त आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती, काँग्रेसचे नेत मल्लिकार्जून खरगे, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांनी बुधवारी दिली.

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांच्या नावाचा आग्रह करण्यात आला. मात्र, त्यांनी नकार दिल्यामुळे अन्य नावांचा विचार केला जात आहे. यासंदर्भात पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील आणि सर्वसंमतीने उमेदवार निश्चित केला जाईल, असे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले. २१ जून रोजी विरोधी पक्षांची पुन्हा बैठक होणार असून, त्यामध्ये उमेदवारावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

Sharad Pawar News, Rajnath Singh News, Presidential Election 2022 News
भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांना जीवे मारण्याची धमकी

राजनाथ यांनी दिल्लीतील कन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार देण्याबाबत झालेल्या १६ पक्षांच्या बैठकीच्या दिवशीच फोनवरुन या नेत्यांसोबत चर्चा केली.राजनाथ यांनी शरद पवारांशीही फोनवरुन या निवडणुकीसंदर्भात चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २९ जून हा अखेरचा दिवस आहे.

ही नावे चर्चेत

तृणमूल काँग्रेसने महात्मा गांधींचे नातू गोपालकृष्ण गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांची नावे सुचवली आहेत. गुलाम नबी आझाद आणि यशवंत सिन्हा यांचेही नाव चर्चेत आहे.

बुधवारी झालेल्या १६ विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांच्या उमेदवारीची शिफारस करण्यात आली. मात्र, पवारांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com