कोरोना लसीच्या प्रमाणपत्रांवर पुन्हा झळकणार पंतप्रधान मोदींचे छायाचित्र

Covid 19 | covid certificate | PM Narendra Modi| आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर पाचही राज्यांत कोरोना प्रमाणपत्रांवरील पंतप्रधानांचे छायाचित्र हटविण्यात आले होते.
covid certificate | PM Narendra Modi
covid certificate | PM Narendra Modi

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांच्या काळात उत्तर प्रदेश (Uttar pradesh)गोव्यासह (Goa) ५ राज्यांत कोरोना लसीकरण प्रमाणपत्रांवरून हटविण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लवकरच पुन्हा दिसणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याबाबतची निश्चित योजना आखली आहे. निवडणुका संपून नवीन सरकारचा शपथविधी होताच आचारसंहिता समाप्त होते.

यावर्षी ८ जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब व मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांंची घोषणा केली होती.आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर पाचही राज्यांत कोरोना प्रमाणपत्रांवरील पंतप्रधानांचे छायाचित्र हटविण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयाने या राज्यांत कोवीन ॲपला फिल्टर प्रणाली लावून ही छायाचित्रे प्रसिध्द होणार नाहीत, याची तांत्रिक व्यवस्था केली होती.

covid certificate | PM Narendra Modi
Shivsena : शिवसंपर्क अभियानात शिवसैनिकांची `तक्रार मोहिम`..

कोवीड लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर मोदी यांचे छायाचित्र प्रसिध्द करण्यावर अनेक राजकीय पक्षांनीही तीव्र आक्षेप घेतले होते. संसदेत (राज्यसभा) या विषयावरून प्रचंड गदारोळ झाला होता. तृणमूल कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांच्या याबाबतच्या टिप्पणीवर भाजप सदस्यांनी जोरदार हरकत घेतली होती. देशाच्या जनतेच्या घामाच्या पैशातून होणाऱ्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदी यांचे छायाचित्र छापणे गैर असल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला होता. अनेक राजकीय पक्षांनी याबाबत निवडणूक आयोगाककडे धाव घेऊन तक्रार नोंदविली होती. असे करणे विशेषतः निवडणुका होणाऱ्या राज्यांत आचारसंहितेचे धडधडीत उल्लंघन असल्याचे व त्यामुळे किमान तेथे तरी हे छायाचित्र कोरोना प्रमाणपत्रांवरून हटवावे या पक्षांनी म्हटले होते. त्यानंतर आयोगाने निवडणुकांच्या काळात मोदींचे छायाचित्र छापू नका, असे निर्देश आरोग्य मंत्रालयास दिले होते.

आता निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्याने कोरोना लसीकरण प्रमाणपत्रांवर पुन्हा मोदींचे छायाचित्र प्रसिध्द करण्यची जय्यत पूर्वतयारी केंद्र सरकारने केली आहे. ही प्रक्रिया सर्वोच्च प्राधान्याने पूर्म करण्याची इच्छा केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार कोवीन पोर्टलमध्ये आवश्यक ते तांत्रिक फेरबदल करण्याची प्रक्रियाही आरोग्य मंत्रालयाने सुरू केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com