पंतप्रधान मोदींकडे फक्त 1 कोटीची मालमत्ता 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, मेनका गांधी, स्मृती इराणी यांच्यासह अनेक मंत्र्यांना आपल्या मालमत्तेचा तपशील 31 ऑगस्टपूर्वी सादर करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले.
NARENDRA-MODI
NARENDRA-MODI
Published on
Updated on

नवी दिल्ली    :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 2016-17 या आर्थिक वर्षात 1 कोटी 13 हजार 403 रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती एका सरकारी संकेतस्थळाद्वारे उघड झाली आहे. 

मोदी यांच्याकडे एकूण मालमत्तेपैकी 1.5 लाख रुपये रोख स्वरूपात असून, गतवर्षी हा आकडा 89 हजार 700 रुपये इतका होता. पारदर्शक कारभाराचे प्रतीक म्हणून नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालमत्तेची माहिती सादर केली असून, त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील केवळ 15 मंत्र्यांनीच आपल्या मालमत्तेचा तपशीप जाहीर केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात प्रामुख्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा  स्वराज, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्तार अब्बास नक्वी यांचा समावेश आहे. 

जेटली यांच्या संपत्तीत गतवर्षीच्या तुलनेत (60.99 कोटी) वाढ होत ती 67.62 कोटी रुपये झाली आहे. त्यांच्या चार बॅंक खात्यांमध्ये 64 लाख रुपयांची रक्कम असून, 1.29 कोटी रुपयांच्या दागिन्यांचाही यात समावेश आहे. स्वराज यांच्याकडे 5.33 कोटी, तर प्रकाश जावडेकर यांच्याकडे 1.55 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानुसार, मंत्रिमंडळात 92 मंत्र्यांचा सहभाग आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com