Delhi News : दिल्लीच्या जंतरमंतरवर मागील २२ दिवसांनंतरही कुस्तीपटूंचं आंदोलन सुरुच आहे.आंदोलक बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत हे आंदोलन छेडले आहे. महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंहांवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. या आंदोलनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
क्रीडापटूंकडून सुरु असलेल्या आंदोलनाला 22 दिवस उलटले तरी अद्यापही आंदोलन(Protest)कर्त्यांपर्यंत कुणीच पोहचले नाही. त्यामुळे आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही अशी खंतही या क्रीडापटूंनी व्यक्त केली. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्ती महासंघाच्या संपूर्ण मंडळाचे झालेले विसर्जन हा आपला पहिला विजय असल्याचं सांगितलं.
याचवेळी महिला कुस्तीपटूंनी रविवारी((दि.१४) पत्रकार परिषदेत खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपच्या इतर 41 महिला नेत्यांना पत्र लिहून आपल्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.त्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपावरून ब्रिजभूषण (BJP MP Brij Bhushan Sharan Singh) यांना अटक करण्याची मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहेत.
भाजपच्या महिला ४१ नेत्यांना पत्र
या आंदोलनात प्रत्येकजण सहकार्य करत राहील तेवढा मला एक मुलगी असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटेल अशा भावनाही या आंदोलनातून व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी आंदोलक कुस्तीपटूंनी भाजपच्या सर्व महिला खासदारांनाही आता पत्र लिहिले आहे. कुस्तीपटूंनी भाजपच्या महिला खासदारांना आपले जीवन आणि खेळ बाजूला ठेवून प्रतिष्ठेसाठी लढण्याचा निर्णय घेतल्याची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
कुस्तीपटू काय म्हटलंय?
ब्रिजभूषण शरण सिंह( या प्रकरणात गुन्हेगार असल्याचं मी संपूर्ण देशासमोर सांगत आहे. त्याचबरोबर या व्यवस्थेविरोधात उभा राहण्यासाठी सर्व महिलांनी जंतरमंतरवर यावं. याशिवाय लोकांनी आपापल्या घरी आणि जिल्हा मुख्यालयी जाऊन ब्रिजभूषण यांच्याविरोधात निवेदन देऊन या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहनही क्रीडापटूंनी केलं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.