कॉग्रेसच्या खासदार पतीसाठी भाजपच्या प्रचारात ; 'कॅप्टन'साठी मते मागणार

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (amrinder singh) यांच्या पत्नी पटियालाच्या खासदार परनीत कैार (mp preneet kaur)यांनी शनिवारी भाजपच्या प्रचारात सहभाग घेतला.
mp preneet kaur
mp preneet kaursarkarnama

नवी दिल्ली : कॉग्रेसच्या खासदार आपल्या पतीच्या प्रचारासाठी थेट भाजपच्या बैठकीत सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ''आधी कुटुंब मग पक्ष'' असे म्हणत त्या आपल्या पतीच्या प्रचारात सामील झाल्या. ''माझ्या पतीच्या पक्षाचे उमेदवार संपूर्ण राज्याच्या निवडणुकीच्या मैदानात आहेत, मी त्यांच्यासाठी मते मागणार आहे,'' असे त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुनावले.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (amrinder singh) यांच्या पत्नी पटियालाच्या खासदार परनीत कैार (mp preneet kaur)यांनी शनिवारी भाजपच्या प्रचारात सहभाग घेतला. त्यामुळे अनेक दिवसापासून पडद्यामागून भाजपचा प्रचार करणाऱ्या परनीत कैार यांनी आपण भाजपचा प्रचार करणार असल्याचे यातून सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर हल्लाबोल केला.

परनीत कैार म्हणाल्या,''मुख्यमत्री चरणजीत सिंह चन्नी जर ''बंधु धर्म''जपत असतील तर मीपण 'पत्नी धर्म' का जपू नये. चन्नी यांचे बंधू डॅा. मनोहर सिंह बस्सी पठाना येथून कॅाग्रेसचे उमेदवाराच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. चन्नी यांचे बंधू तर एका जागेवर निवडणूक लढवत आहे, माझ्या पतीचा पक्ष राज्यात निवडणूक लढवत आहे. मी त्यांच्यासाठी मते मागणार आहे,''

एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ''मी माझ्या पतीसाठी प्रचारात सहभाग घेणार आहे,'' भाजपचा प्रचार करताना तुमच्या भविष्याचे काय? यावर त्या म्हणाल्या, ''यांचे उत्तर भविष्यात देईल,'' ''कॅाग्रेससाठीही मी प्रचार करणार आहे,'' असे त्या म्हणाल्या. ''माझ्यासाठी माझा परिवार महत्वाचा आहे,'' असे विधान त्यांनी दोन दिवसापूर्वी केले होते.

भाजपचे नेता आशुतोष गैातम यांच्या प्रचार सभेत परनीत कैार म्हणाल्या, ''अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या विकासासाठी फार मोठे योगदान दिले आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे. पंजाबच्य सीमा असुरक्षित आहेत. पाकिस्तान ड्रोनच्या माध्यमातून शस्त्र आणि अमली पदार्थ पाठवित आहे. कॅप्टन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र काम करणार असतील तर पंजाबचा विकास वेगाने होईल,''

mp preneet kaur
उत्तरप्रदेशच्या आखाड्यात ११४ आठवी पास, १२ निरक्षर तर ६ पीएचडीधारक!

पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याचा आरोप करुन काही दिवसापूर्वी परनीत कैार यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागितले होते. गेल्या वर्षी कॉग्रेसचे प्रभारी नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबत वाद झाल्याने अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदावरुन हटविण्यात आले होते.

मुख्यमंत्री पदावरुन हटविल्यानंतर त्यांना पंजाब लोक कॉग्रेसची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखालील पीएलसी, भाजप, शिअद (संयुक्त) हे एकत्र निवडणूक लढवित आहेत. अमरिंदर सिंह हे आपल्या पटियाला (शहर) पंजाब लोक कॉग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्या विरोधात कॉग्रेसकडून विष्णु शर्मा मैदानात आहेत. (punjab assembly elections congress mp preneet kaur asked for vote for husband captain amrinder singh)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com