मुख्यमंत्र्यांनी महिन्यातच शब्द खरा करुन दाखवला अन् केली विजबिलांची होळी!

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चन्नी यांनी दिलेला शब्द अखेर पाळला आहे. आज त्यांनी जाहीरपणे वीजबिलांची होळी करून हे जाहीर केले.
Charanjit Singh Channi
Charanjit Singh Channi
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) अमरिंदरसिंग यांना हटवून त्यांच्या जागी चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना मुख्यमंत्री (Chief Minister) बनवण्यात आले आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चन्नी यांनी दिलेला शब्द अखेर महिन्याच्या आतच खरा करून दाखवला आहे. आज त्यांनी जाहीरपणे वीजबिलांची होळी करून हे जाहीर केले.

चन्नी यांनी महिन्याच्या आतच जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. चन्नी यांनी मागील महिन्यात 2 किलोवॉट क्षमतेपर्यंत वीजजोडणी असणाऱ्यांना वीजबिल माफ करण्याची घोषणा केली होती. आज त्यांनी त्याची अंमलबजावणी केली. वीजबिलांची जाहीर होळी करून त्यांनी वीजबिल माफीची अंमलबजावणी जाहीर केली. याचबरोबर वीजबिल न भरल्याने खंडित करण्याता आलेला वीजपुरवठा कोणताही दंड न आकारता पूर्ववत करण्यासही सुरवात झाली आहे. या निर्णयामुळे पंजाब सरकावर 1 हजार 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

चन्नी यांनी 20 सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी मोठ्या घोषणा केल्या होत्या. ते म्हणाले होते की, यापुढे कृषीपंपांसाठी वीजबिल असणार नाही. याचबरोबर गरीब कुटुंबांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही. वीजपुरवठा खंडित झालेल्या असल्यास तो तातडीने जोडण्यात येईल आणि वीजबिल माफ केले जाईल. पंजाबची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो.

Charanjit Singh Channi
भाजपची राष्ट्रीय रणनीती ठरवण्याची बैठक अन् पंकजा मुंडेंसह तावडेंची हजेरी

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. चरणजितसिंग चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता. राहुल गांधी हे शपथविधीसाठी राजभवनावरही हजर होते.

Charanjit Singh Channi
तेलगीचं भूत पुन्हा बाहेर? महाराष्ट्र सरकार घेरणार सीबीआय संचालकांना

सुरवातीला मुख्यमंत्रिपदासाठी माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात होते. प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना अमरिंदरसिंग यांचाच विरोध होता. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून सिध्दू यांना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले गेले नाही. तसेच, प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड केल्यानं त्यांचे नाव शर्यतीत मागे पडले. तर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. अखेर चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com