एकच शरीर असलेल्या जुळ्या भावंडांचं पहिलं मतदान ठरलं ऐतिहासिक

सोहना-मोहना या जुळ्या भावंडांना रविवारी पहिल्यांदाच मतदान केलं. निवडणुकीच्या इतिहासातील ही दुर्मिळ घटना मानली जात आहे.
Sohna Singh and Mohna Singh
Sohna Singh and Mohna Singh Sarkarnama

अमृतसर : कंबरेखाली एकच शरीर पण हृदय, डोके, हात वेगळे असलेल्या पंजाबमधील (Punjab Conjoined Twins ) प्रसिद्ध सोहना-मोहना (Sohana & Mohana Singh) या जुळ्या भावंडांना रविवारी पहिल्यांदाच मतदान केलं. निवडणुकीच्या इतिहासातील ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. कारण शरीर एकच असलं तरी दोघांच्या मतदानाची गोपनीयता राखण्यासाठी निवडणूक आयोगाला वेगळी व्यवस्था करावी लागली. त्यानुसार दोघांनीही आपला मतदानाचा (Voting) हक्क बजावत इतिहास घडवला.

पंजाबमधील विधानसभेच्या (Punjab Election 2022) 117 जागांसाठी रविवारी (ता. २०) मतदान होत असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी सोहना आणि मोहना यांना दोन स्वतंत्र मतदार (Voters ID Card) ओळखपत्रे देण्यात आली आहेत. मागील वर्षी ते 18 वर्षांचे झाले होते. मतदानावेळी त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दोघांनाही स्वतंत्रपणे मतदान करता येईल आणि त्यांची गोपनीयता राखली जाईल, याची दक्षता आयोगानं घेतली. (Punjab Election Update)

Sohna Singh and Mohna Singh
सरपंचासोबत उपसरपंचाचं ग्रामपंचायतीतच जमलं अन् वर्षभरात बँड..बाजा..बारात!

निवडणूक आयोगाने (ECI) सोहना आणि मोहना यांना स्वतंत्र मतदार मानले होते आणि दोघांना वैयक्तिक मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोघांनी अमृतसरमधील बूथ क्रमांक १०१ वर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. दोघांनी आपल्या मर्जीने मतदान केलं.

असं केलं दोघांनी मतदान...

मतदान कक्षात दोघांच्यामधे एक पडदा टाकण्यात आला होता. त्यामुळे दोघेही एकमेकांना पाहू शकत नव्हते. तसेच दोघांना विशिष्ट प्रकारचा चष्माही देण्यात आला होता. आयोगाकडून त्यांच व्हिडीओ शुटिंगही करण्यात आलं. त्यांचं शरीर वेगळं नसलं तरी ते वेगळे मतदार आहेत. त्यामुळे गोपनीयता राखण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर ते म्हणाले, मतदान केल्यानंतर खूप आनंद झाला. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

आई-वडिलांनी दिलं सोडून...

सोहन सिंह व मोहन सिंग या दोघांना जन्म दिल्लीत २००३ मध्ये झाला. पण त्यांच्या शारीरिक स्थितीमुळे आई-वडिलांनी त्यांना सोडून दिलं. अमृतसरमधील एका स्वयंसेवी संस्थेने त्यांचा सांभाळ केला. दोघांनी आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदविका प्राप्त केली आहे. आता ते एका सरकारी कार्यालयात नोकरी करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com