Exit Poll : पंजाबमध्ये आपचा झाडू काँग्रेसचा सुफडा साफ करणार

पंजाबमध्ये आपचा झाडू चालणार असून काँग्रेसला सत्ता गमवावी लागणार असल्याचे बहुतेक एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झालं आहे.
Charanjit Singh Channi and Arvind Kejriwal
Charanjit Singh Channi and Arvind Kejriwal Sarkarnama

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) एक्झिट पोल (Exit Poll) येऊ लागले आहेत. पंजाबमध्ये आपचा (AAP) झाडू चालणार असून काँग्रेसला (Congress) सत्ता गमवावी लागणार असल्याचे बहुतेक एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झालं आहे. राज्यात आपला बहुमत मिळत असून पुढचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) असतील, असंच चित्र आहे. काँग्रेसचा जेमतेम 30 पर्यंत जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर भाजप व मित्र पक्ष दोन आकडी जागाही मिळवू शकणार नाही.

पंजाबमधील (Punjab Election 2022) २२ जिल्ह्यातील सर्व ११७ जागांवर 20 फेब्रुवारी रोजी मतदान झाले आहे. पंजाबमध्ये एकाच टप्यात मतदान झाले असून दहा मार्च रोजी निवडणुकीचा निकाल आहे. राज्यात कॉग्रेसला आपची टक्कर आहे. निवडणुकीत भाजप हा शिरोमणी अकाली दलापासून वेगळा झाला आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) नवे राजकीय भागीदार म्हणून भाजपसोबत आहेत. पण त्याचा काही परिणाम निवडणुकीत झालेला दिसत नाही.

Charanjit Singh Channi and Arvind Kejriwal
Exit Polls : भाजप 'यूपी'चा गड राखणार; दोनशेहून अधिक जागांचा अंदाज

'एनडीटीव्ही'ने विविध एक्झिट पोलच्या केलेल्या सरासरीमध्ये काँग्रेसची पंजाबमधील सत्ता जाताना दिसत आहे. राज्यात काँग्रेसला जवळपास 50 जागांचे नुकसान होत असून केवळ 27 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तर आप 70 जागांच्या जवळपास पोहचत राज्यात सत्ता मिळवेल. मागील निवडणुकीत आपला केवळ 20 जागा मिळाल्या होत्या. दिल्लीनंतर आपला पंजाबमध्ये सत्ता मिळणार असल्याची चिन्हं आहेत.

आपला 68 जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. शिरोमणी अकाली दलाचा करिष्माही या निवडणुकीत चाललेला नाही. या पक्षाला केवळ दोन जागा अधिक वाढल्याचे दिसते. या निवडणुकीत अकालीला 17 जागा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होऊनही भाजपला काहीच फायदा झालेला दिसत नाही. पक्षाला केवळ तीन जागा मिळेल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

मागील निवडणूक व एक्झिट पोलमधील पंजाबची स्थिती -

पक्ष मागील निवडणुकीतील जागा एक्झिट पोल

काँग्रेस 77 27

आप 20 68

शिरोमणी अकाली दल 15 17

भाजप 3 3

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com