Punjab Police release pics of 7 different looks of Amritpal Singh : खालिस्तानी समर्थक आणि 'वारिस पंजाब डे'चे प्रमुख अमृतपाल सिंग यांचा पंजाब पोलिस शोध घेत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फरार अमृतपाल यांचे अनेक व्हिडिओ आणि छायचित्र प्रसिद्ध केले आहेत. व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून जनतेने त्याला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पंजाब पोलिसांनी अमृतपालचे विविध छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत. यात तो क्लीन शेव ते दाढी-पगडी अशी विविध छायाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. एका व्हिडिओमध्ये तो दुचाकीवर बसलेला आहे, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो एका कारमधून जात असल्याचे दिसते. पंजाब पोलिस त्याचा राज्यभर शोध घेत आहेत.
पंजाबचे पोलिस महानिरीक्षक सुखचैन सिंह गिल यांनी हे दोन व्हिडिओ आणि सात छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
एनआयएची 8 पथके पंजाबमध्ये पोहोचली असून या पथकांनी अमृतसर, तरनतारन, जालंधर, गुरुदासपूर, जालंधर जिल्ह्यात तपास सुरू केला आहे.
अमृतपालला बळजबरीने कोठडीत ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. अमृतपाल कुठे आहे, आता कुणालाच माहिती नाही. मात्र, पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात ठेवल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. दुसरीकडे पोलिसांच्या वतीने व NIA तपास यंत्रणेकडून अमृतपालच्या कुटुंबीयांच्या खाते तपासले जात आहे.
अमृतपालला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने जॉर्जियामध्ये शस्त्र वापरण्याचे प्रशिक्षण दिल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे. पंजाबमध्ये येण्यापूर्वी तो दुबईहून जॉर्जियाला गेला होता. आनंदपूर खालसा फोर्स (AKF) तयार करण्याची त्यांची तयारी देखील या प्रशिक्षणाचा एक भाग होता. पंजाबमध्ये अशांतता निर्माण करून देशातील वातावरण बिघडवण्याचे संपूर्ण प्रशिक्षण त्याला जॉर्जियामध्ये देण्यात आले होते.
अमृतपाल यांच्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये पंजाब सरकारचे महाधिवक्ता विनोद घई यांनी सांगितले की, अमृतपाल अजूनही फरार आहे. त्याच्यावर एनएसए लागू करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाने सरकारला विचारले की, अमृतपालचे प्रतिज्ञापत्रात देशासाठी धोका असल्याचे वर्णन केलेले आहे. मग त्याला अद्याप का पकडण्यात आले नाही? 80 हजार पोलिसांचा फौजफाटा काय करतो? हे तुमच्या इंटिलिजन्सचे अपयश आहे? यासह अनेक प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केले. या प्रकरणावर पुन्हा 4 दिवसांनी सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.