

Indian Rupee Fall 2026 : आशियामधील दुसऱ्या क्रमांकाची वाईट कामगिरी असणारे चलन म्हणून भारतीय रुपयाने 2026 मध्ये आतापर्यंत सुमारे सहा टक्क्यांहून अधिक मूल्य गमावले आहे. सरलेल्या मे महिन्यात देखील रुपयाने 96.66 या ऐतिहासिक नीचांकी पातळीला स्पर्श केला आहे. यातच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोठा सल्ला दिला आहे.
रुपयाच्या घसरणीला रोखण्यासाठी भारताने परकीय चलनाचा साठा वेगाने खर्ची करू नये, असा हा सल्ला आहे. रघुराम राजन यांनी दिलेला हा सल्ला सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप मोदी सरकारला किती पचनी पडतो याकडे आता लक्ष लागले आहे.
जागतिक पातळीवर अस्थिरतेचे वातावरण आहे. सध्याच्या या वातावरणात काही प्रमाणात चलनाचे (Economy) अवमूल्यन होणे वाईट नाही. कारण त्यामुळे निर्यातीला प्रोत्साहन मिळते. यातून आंतरराष्ट्रीय व्यापारात आपल्या वस्तू अधिक स्पर्धात्मक बनतात, असेही रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी स्पष्ट केले.
रघुराम राजन म्हणाले, "तेलाच्या किमती उच्च राहिल्या, तर चालू खात्यावरील तूट आणखी वाढण्याची शक्यता आहे. तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकेच्या सरकारी रोख्यांवरील परताव्यातील वाढ आणि परकीय गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातून सुरू असलेला निधीचा उपश्यामुळे रिझर्व्ह बँकेला (RBI) हस्तक्षेप वाढवावा लागेल."
महागाई आणि व्यापक आर्थिक परिस्थितीवर विपरीत होणारे परिणाम रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला हस्तक्षेप वाढवावाच लागेल, असे सांगून, सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत मध्यवर्ती बँकेने परकीय चलन गंगाजळीचा अतिशय काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, असेही रघुराम राजन यांनी म्हटले. उपायांसाठी उभा केलेल्या पैशांमधील मोठा वापर केला गेल्याकडेही रघुराम राजन यांनी लक्ष वेधले.
भविष्यात अनेक जागतिक घडामोडी संभाव्य आहे. त्यामुळे एका विशिष्ट पातळीवर रुपयाच्या पडझडीला रोखण्यासाठी हा साठा झपाट्याने संपवणे योग्य ठरणार नाही. पश्चिम आशियातील युद्धे असेच पुढे पेटत राहिल्यास, त्याचा परिणाम आखाती देशांमधील ऊर्जा पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्यास भारतासारख्या ऊर्जा आयात करणाऱ्या उभरत्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, असेही रघुराम राजन यांनी म्हटले.
वित्तीय धोरण ठरवता, आता रिझर्व्ह बँकेला कठोरत, दूरदृष्टी आणि आव्हानात्मक धोरण निश्चित करून, पाठपुरावा करावा लागणार आहे. वेळप्रसंगी कडू निर्णय घ्यावे लागतील, त्यातून आर्थिक संवेदनशीलतेचे धोरण अंगीकारावे लागणार आहे, असे ठाम मत रघुराम राजन यांनी व्यक्त केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.