मुंबई : 'हमारा बजाज' म्हणत सर्वसामान्यांचे वाहनाचे स्वप्न पुर्ण करणाऱ्या देशातील अग्रगण्य उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे शनिवारी निधन झाले. (Rahul Bajaj Passes away) ते ८३ वर्षांचे होते. गेल्या ५ दशकांमध्ये बजाज उद्योग समूहाला (Bajaj Group) नावारूपाला आणण्यात आणि 'बजाज ऑटो'ला दुचाकी- तीन चाकी वाहन क्षेत्रात सर्वोच्च कंपनी बनवण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले (राजीव आणि संजीव) आणि एक मुलगी (सुनैना केजरीवाल) असा परिवार आहे.
दरम्यान बजाज यांना एका यशस्वी उद्योजकासोबत अत्यंत स्पष्टवक्ता माणूस म्हणून देखील ओळखलं जात होतं. कोणत्याही पक्षाचं सरकार असो ते त्यांच्याबाबत स्पष्ट शब्दात आपलं मत नोंदवायचे. आपल्या स्पष्टवक्ते पणामुळे त्यांनी एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भर कार्यक्रमात शेकडो लोकांसमोर आक्रमक होतं सुनावले होते. बजाज यांनी केंद्र सरकारवर टीका करताना हे सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत असल्याचे म्हटले होते. (Amit Shah-Rahul Bajaj Controversy)
नेमके काय झालेले?
३० नोव्हेंबर २०१९ रोजी मुंबईमध्ये पार पडलेल्या Economic Times Awards कार्यक्रमात राहुल बजाज बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर केंद्रीय मंत्री अमित शहा, पियुष गोयल आणि निर्मला सीतारमन सुद्धा उपस्थित होत्या. तेव्हा यांनी तिन्ही मंत्र्यांना उद्देशून प्रश्न विचारला होता.
राहुल बजाज त्यावेळी म्हणाले, "आम्ही तुमच्याकडून जरा चांगल्या उत्तराची अपेक्षा करतो, फक्त गोष्टी फेटाळू नका. यूपीएच्या काळात सरकारला टीका करण्याचे, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य होते. सध्या मात्र सरकारला टीका सहन होत नाही. लोक सरकारला प्रश्न का विचारू शकत नाहीत?"
बजाज यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शहा यांनी म्हटले, की कोणी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही बोलू शकताय याचा अर्थ कोणीही घाबरलेल्या वातावरणात राहत नाही. दरम्यान, बजाज यांनी अमित शाह यांना खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेंबद्दल केलेल्या विधानासंबंधीही प्रश्न विचारला होता.
"गोडसे दहशतवादी होता, यामध्ये कोणतीही शंका आहे का?" असं राहुल बजाज यांनी विचारले होते. यावर उत्तर देताना अमित शहांनी पक्षाने प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे, असे स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.