Rahul Gandhi : कैसे है ? आप आज 'शेल शॉक्ड' लग रहे हो...राहुल गांधींचा मीडियाला मिश्किल सवाल

Rahul Gandhi Press Conference : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळेल आणि मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर बसतील, याचे विश्लेषण मांडून 'एनडीए'ला 350 पेक्षा अधिक जागा मिळतील, असे एक्झिट पोलमधून सांगण्यात आले होते.
Rahul Gandhi Press Conference
Rahul Gandhi Press Conference Sarkarnama

Rahul Gandhi Press Conferance : 'नमस्कार... कैसे है? आप आज 'शेल शॉक्ड' (धक्कादायक) लग रहे हो... काँग्रेसने यह क्या किया, कैसे किया...' चेहऱ्यावर गोड हसू ठेवून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मिश्किलपणे मीडियाच्या प्रतिनिधींना टोला लागावला. त्यापलीकडे जाऊन राहुल यांनी निकालाआधीच्या 'एक्झिट पोल'ची पोलखोल करून टाकली आणि हा पोल कसा खोटा होता, हेही पटवून दिले.

दिल्लीत प्रेस कॉन्फरन्सची सुरवातच राहुल यांनी धडाक्यात केली. एक्झिट पोल खोटा ठरवून 'इंडिया'ला 234 जागा मिळाल्यानंतर राहुल आणि काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळेल आणि मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर बसतील, याचे विश्लेषण मांडून 'एनडीए'ला 350 पेक्षा अधिक जागा मिळतील, असे एक्झिट पोलमधून सांगण्यात आले होते.

त्यामुळे मोदी सरकार निश्चित मानले गेले. मात्र, निकालाचे आकडे नेमके उलट फिरले, भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. 'एनडीए' 300 जागा पारही करू शकली नाही. साहजिकच मित्रपक्षांच्या साथीनेच मोदी सरकार सत्तेत येणार आहे. दुसरीकडे 'इंडिया'कडेही 234 खासदार असल्याने एनडीएतील काही पक्षांना गळ घातले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अलर्ट राहण्याची विनंती थेट मोदी-शहांनीच घटक पक्षांच्या प्रमुखांना केल्याचे समजते. त्यामुळे इंडियाचे सरकार आणण्यासाठी पुढच्या काळात काही चाली केल्या जाऊ शकतात, हेही बोलले जात आहे.

Rahul Gandhi Press Conference
Rahul Gandhi on Stock Market : मोठी बातमी : मोदी-शाहांनी घडवला 'शेअर मार्केट स्कॅम'; राहुल गांधींचा पहिला वार

या पार्श्वभूमीवर पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये राहुल गांधी खूष दिसले. तेव्हा, पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नावर कधी आक्रमकपणे तर कधी तेवढ्या मोकळेपणाने उत्तर देऊन, आपला मोदी सरकारला घेरणार असल्याचेच बोलून दाखवले. परंतु, एक्झिट पोल आणि शेअर मार्केटमधील उलथापालथीवरून मोदी-शहांना टार्गेट केले गेले. त्यामुळे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये राहुल नव्या भूमिकेत राहू शकतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com