Rahul Gandhi : राहुल गांधींनी हरियाणा, नाशिकमधील 'मॉब लिंचिंग'च्या घटनांवर व्यक्त केला संताप!

Rahul Gandhi on Mob lynching : 'द्वेषाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करून, सत्तेच्या शिडीवर चढलेले लोक देशभरात...' असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi on mob lynching incident in Haryana and Nashik : राहुल गांधी यांनी मॉब लिंचिंगच्या घटनांवर संताप व्यक्त करत, मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप सरकारच्या काळात उपद्रवींना मोकळीक दिली गेली आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला. शिवाय ते म्हणाले, अल्पसंख्याक, विशेष करून मुस्लिमांवर सातत्याने हल्ले होत आहेत आणि सरकारी यंत्रणा मात्र मूक दर्शक बनून सगळं काही बघत आहे.

राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्रातील नाशिक आणि हरियाणामधील चरखी येथे जमावाकडून झालेल्या हिंसेचा संदर्भ दिला गेला. त्यांनी एक्सवर म्हटले की, द्वेषाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करून, सत्तेच्या शिडीवर चढलेले लोक देशभरात सतत भीतीचे राज्य प्रस्थापित करत आहेत. गर्दीच्या आड लपलेली द्वेषी घटक कायद्याच्या राज्याला आव्हान देत उघडपणे हिंसा पसरवत आहेत.

Rahul Gandhi
Prashant Kishor News : प्रशांत किशोर यांनी 'हे' विधान करून 'RJD'समोर निर्माण केला पेच!

याचबरोबर राहुल गांधी यांनी असाही आरोप केला की, भाजप(BJP) सरकारकडून या उपद्रवींना मोकळीक मिळालेली आहे. त्यामुळेच त्यांच्यात अशी कृत्ये करण्याची हिंमत निर्माण झाली आहे. अल्पसंख्याक, विशेष करून मुस्लिमांवर सातत्याने हल्ले होत आहेत आणि सरकारी यंत्रणा मूक प्रेक्षक बनून पाहत आहे. अशा अराजकतावादी घटकांविरोधात कठोरातील कठोर करवाई करून कायद्याचे वचक कायम ठेवला गेला पाहीजे.

राहुल गांधींनी पुढे लिहिले की, भारताची सांप्रदायिक एकता आणि भारतीयांच्या हक्कांनवर कोणत्याही प्रकारचा हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे, जो आम्ही कदापि सहन करणार नाही. भाजपने किती प्रयत्न केले तरी द्वेषाविरोधात भारताची एकजूट करण्याची ही ऐतिहासिक लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकूच.

काय होत्या घटना? -

हरियाणामधील चरखी दादरी अंतर्गत येणाऱ्या बाढडा येथे २७ ऑगस्ट रोजी कथितरित्या गोमांस शिजवल्याच्या वादातून झोपडीत राहत असलेल्या एका तरूणाची बेदम मारून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सातही आरोपींनी पोलिसांनी अटक केली होती.

तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळ एका एक्स्प्रेस ट्रेनमध्ये जळगाव जिल्ह्यातील एका वयस्कर व्यक्तीला प्रवाशांकडून मारहाण झाली. कारण, त्या वयस्कर व्यक्तीकडे गोमांस असल्याचा प्रवांशना संशय आला होता. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com