राजस्थानमध्ये राजकीय संकट; राहुल गांधींनी पाठवला महत्त्वाचा संदेश

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Congress) रणधुमाळी सुरु असतानाच राजस्थानमध्ये (Rajasthan) कॉंग्रेसचे दोन गट आमने-सामने आले आहेत.
Rahul Gandhi
Rahul Gandhisarkarnama

Rajasthan Politics : नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Congress) रणधुमाळी सुरु असतानाच राजस्थानमध्ये (Rajasthan) कॉंग्रेसचे दोन गट आमने-सामने आले आहेत. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडीचा विषय काहीसा बाजूला गेला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्याची निवड हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. गेहलोत समर्थक 102 आमदारांमधूनच मुख्यमंत्री करण्यावर ठाम आहेत.

तर दुसरीकडे सचिन पायलट यांच्याही मुख्यमंत्री होण्यासाठी हालचाली सुरु आहेत. अशातच काँग्रेसने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना निरीक्षक म्हणून राजस्थानमध्ये पाठवले होते. या नेत्यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बैलावली होती. मात्र, बैठकीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या गटातील आमदारांनी बैठकीला हजेरी लावली नाही.

Rahul Gandhi
लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं आणखी एक नवं अभियान

पक्षाचे दोन्ही निरीक्षक दिल्लीला परतले. मात्र, 'भारत जोडो' यात्रेचा एक भाग म्हणून केरळमधील पदयात्रेवर असलेल्या खासदार राहुल गांधी यांनी त्यांचे दूत आणि पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना दिल्लीला पाठवले आहे. राहुल यांचा संदेश घेऊन वेणुगोपाल सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यांतर का होईना हे संकट दूर होईल, असे मानले जात आहे.

अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे अधिकृतरित्या कोणती भूमिका घेणार त्यावर राजस्थान कॉंग्रेसमधल्या वादावर तोडगा निघेल हे अवलंबून असणार आहे. पण सध्या तरी राजस्थान विधिमंडळ काँग्रेस पक्षातली लढाई जोधपूरच्या रस्त्यावर आणि रस्त्यावरच्या पोस्टर्सवर दिसली आहे.

Rahul Gandhi
Rajasthan Congress : मुख्यमंत्री कोण ? ; पायलटांचे पोस्टर्स झळकले, गेहलोत गटाच्या तीन अटी

'गहलोत समर्थकांनी राजस्थान मधला नेतृत्वाचा पेचप्रसंग हा 19 ऑक्टोबरनंतर म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतरच सोडवावा,' अशी आग्रही मागणी करून अशोक गहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले तरच राजस्थानात त्यांच्या ऐवजी दुसरा मुख्यमंत्री मान्य करू असे स्पष्ट केले आहे. शिवाय 'सचिन पायलट नको,' ही गहलोत यांची भूमिका त्यांनी रेटून पुढे लावून धरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com