नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Congress President Election) रणधुमाळी सुरु असतानाच राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे दोन गट आमने-सामने आले आहेत. (Congress President Election news update)
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडीचा विषय काहीसा बाजूला गेला आहे, मात्र राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्याची निवड हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. गेहलोत समर्थक 102 आमदारांमधूनच मुख्यमंत्री करण्यावर ठाम आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत गटाने पक्षश्रेष्ठींनाच आव्हान दिले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर गहलोत गटाने बहिष्कार टाकला आहे. 'काँग्रेस अध्यक्ष निवडीपर्यंत म्हणजेच 19 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही बैठकीत सहभागी होणार नाही,' असा निर्णय या गटाने घेतला आहे. त्यांनी तीन अटीही घातल्या आहेत.
अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे अधिकृतरित्या कोणती भूमिका घेणार त्यावर राजस्थान कॉंग्रेसमधल्या वादावर तोडगा निघेल हे अवलंबून असणार आहे. पण सध्या तरी राजस्थान विधिमंडळ काँग्रेस पक्षातली लढाई जोधपूरच्या रस्त्यावर आणि रस्त्यावरच्या पोस्टर्सवर दिसली आहे.
'गहलोत समर्थकांनी राजस्थान मधला नेतृत्वाचा पेचप्रसंग हा 19 ऑक्टोबरनंतर म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतरच सोडवावा,' अशी आग्रही मागणी करून अशोक गहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले तरच राजस्थानात त्यांच्या ऐवजी दुसरा मुख्यमंत्री मान्य करू असे स्पष्ट केले आहे. शिवाय 'सचिन पायलट नको,' ही गहलोत यांची भूमिका त्यांनी रेटून पुढे लावून धरली आहे.
निरीक्षक अजय माकन म्हणाले, "आमदारांनी विधिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहणे ही अनुशासन हीनता आहे. या बैठकीदरम्यान त्यांनी स्वतः बैठक बोलावली. हीदेखील अनुशासनहीनता असून त्यावर काय कारवाई करता येईल ते आम्ही पाहू. आम्ही प्रत्येक आमदारांशी बोलू. त्यांचे एकेक करून मत जाणून घ्यायचे आहे,"
कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे रिंगणात उतरणार आहेत. गेहलोत हे काँग्रेस अध्यक्ष झाले तर सचिन पायलट मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी शक्यता आहे, त्यामुळे राजस्थान कॉंग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची निवड करण्याचा पक्ष श्रेष्ठींचा विचार आहे. पायलट यांना विरोध करणारे गेहलोत यांचे समर्थक 82 आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष सी.पी जोशी यांच्याकडे दिले आहेत. पायलट यांच्या विरोधात वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.
सरकार वाचवणाऱ्या 102 आमदारांमधूनच म्हणजेच गहलोत गटातूनच मुख्यमंत्री व्हावा.
अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यावरच मुख्यमंत्री घोषित करावा.
जो कोणी नवा मुख्यमंत्री असेल, तो गहलोत यांच्या पसंतीचा असावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.