Rahul Gandhi News : "तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान केला का?" ; राहुल गांधी म्हणाले...

Rahul Gandhi Press Conference : तुम्ही भाजपसाठी काम करत असाल तर...
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi On Obc Community : काँग्रेसंचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सुरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर काल (दि. २४ मार्च) त्यांची संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. काँग्रेस पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोध तीव्र संताप व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.

Rahul Gandhi
Raju Shetti News : विरोधी पक्षात जाल, तेव्हा तुमची काय हालत होईल? ; शेट्टींचा भाजपला खुला इशारा..

या पत्रकार परिषेदेत एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला आला की, "न्यायालयाचा जो निकाल आला त्यावरून भाजपने म्हंटले आहे की, राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला," या प्रश्नावर राहुल गांधींनी संतापून उत्तर दिले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi on Disqualification: खासदारकी रद्द का केली? राहुल गांधींनी सांगितलं लोकसभेत काय घडलं...

यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, "तुम्ही एवढे थेटपणे भाजपसाठी का काम करत आहात. भाजरसाठी काम करताना जरा संदिग्धतेने करा. जरा फिरून फिरून प्रश्न विचारा. तुम्हाला असं काम करण्यासाठी असा आदेश देण्यात आला आहे का? पहा ते हसत आहेत. जरा फिरून फिरून प्रश्न विचारा. तुम्ही भाजपसाठी काम करत असाल तर, भाजपचे छातीवर भाजपचे सिंबॉल लावून या. तेव्हा मी तुम्हाला त्या प्रमाणेच उत्तर देईन. स्वत:ला माध्यमकर्मी म्हणवून घेवू नका, असे राहूल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले, "भारतात लोकशाहीवर आक्रमण होत आहे. याचे रोज आपल्याला नवे नवे उदाहरण पाहायला मिळत आहे. मी सरकारला एकच प्रश्न विचारला होता. गौतम अदानी यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रूपये कोणी गुंतवले. कारण हे २० हजार कोटी रूपये, कारण हे पैस अदानींचे नाहीत. दुसऱ्या कोणाचे तरी आहेत. मी २० हजार कोटी कोणाचे हाच प्रश्न केला होता."

Rahul Gandhi
Rahul Gandhi On Adani : अदानींच्या कंपनीत २० हजार कोटी कुणी गुंतवले? राहुल गांधींचा थेट मोदींना सवाल!

"मी विचारलं होतं की, गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदींचं नातं काय आहे? हे आजचं नातं नाही, मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून अदानींशी त्यांचं नातं आहे. एअरपोर्ट नियम बदलून ते अदानींना दिले गेले. माझ्यावर आरोप केले जात आहेत की, मी विदेशी शक्तींची मदत घेतली. मी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहलं की, हा खोटा आरोप आहे. आणि यावर मला बोलू दिलं जात नाही. पण अध्यक्षांचं उत्तर आलं नाही, मी प्रश्न विचारण बंद करणार नाही, माझं संसद सदस्यत्व रद्द करून ते मला थांबवतील असं वाटत असेल तर, मी त्यांना घाबरणार नाही," असेही राहुल गांधी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com