Rahul Gandhi News : राहुल गांधीच्या ट्वीटमुळे भाजपचे मुख्यमंत्री भडकले; "आता कोर्टात भटूया.."

Rahul Gandhi News : "अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी रुपये कोणाचे?"
Rahul Gandhi News, Kirit Panwala
Rahul Gandhi News, Kirit Panwala Sarkarnama

Rahul Gandhi On Adani tweet : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गौतम अदाणींचा मुद्दा लावून धरला आहे. राहुल गांधी यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी 'अदानी' असे लिहिलेले दिसून येते. तसेच, त्यांनी पण त्यासोबतच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची नावे त्यात समाविष्ट होते. (Marathi News)

राहुल गांधी यांनी वर्ड पझल ट्वीट मध्ये शेअर केलेल्या फोटोवर गुलाम, सिंधिया, किरण, हिमंत आणि अनिल असे लिहिले होते. हे पाचही नेते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. मात्र आता भाजपमध्ये ते दाखल झाले आहेत. यापैकी गुलाम नबी आझाद यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आहे. राहुल गांधी म्हणाले, "सत्य लपवले जाते, म्हणून दररोज भटकवतात. पण प्रश्न मात्र एकच उरतो. अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी रुपये कोणाचे?"

राहुल गांधींनी शेअर केलेल्या फोटोत हिमंत बिस्वा शर्मा यांचे नाव असल्याने, ते आता चांगलेच संतापले आहेत. बोफोर्स घोटाळ्यातील आणि नॅशनल हेराल्डमधील पैसे तुम्ही कुठे लपवला आहात? याची विचारणा आम्ही कधी केली नाही. तसेच, तुम्ही ओटावियो क्वात्रोचीला यांना वेळोवेळी भारतीय न्यायव्यवस्था कक्षेतून कसे सुटू दिले, हे ही विचारलं नाही. पण आता आपण न्यायालयात भेटू, असा सूचकपणे शर्मा यांनी इशारा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com