Mumbai News: भारत वर्ल्डकप फायनलची मॅच हारल्यानंतर काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ही मॅच पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होते, म्हणूनच भारत हरला ते 'पनौती' आहेत, असं राहुल गांधी म्हणाले होते.
त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जवळपास स्पष्ट होत आला आहे. यामध्ये भाजपने तीन राज्यांत जोरदार मुसंडी मारत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर आता सोशल मीडियावर 'राहुल गांधी पनौती है...' हा हॅशटॅग जोरदार ट्रेंडिंगला आला आहे.
तसेच राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडिओ एक्सवर (ट्विटरवर) व्हायरल होत आहे. अनेकांनी राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर केला असून, हॅशटॅगमध्ये 'राहुल गांधी पनौती है' असे कॅप्शन लिहिले आहे, तर त्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे "राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही सरकार जात आहे,"असे म्हणताना दिसून येत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सोशल मीडियावर सध्या 'राहुल गांधी पनौती है...' या हॅशटॅगने धुमाकूळ घातला असून, जवळपास 70 हजारांपेक्षा जास्त पोस्ट ह्या 'राहुल गांधी पनौती है...' या हॅशटॅगने नेटकऱ्यांनी शेअर केल्या आहेत. यावर अनेकांनी राहुल गांधी हेच पनौती आहेत, असेही म्हटले आहे.
दुसरीकडे भाजपच्या अनेक नेत्यांनीही राहुल गांधींवर जोरदार टीका केली असून, "पनौती नेमकं कोण आहे?", असा सवाल केला आहे. भाजप (BJP) नेते सीटी रवी यांनीही गांधींवर निशाणा साधला आहे. "सर्वात मोठी पनौती कोण आहे ? काही माहिती आहे का ?" अशी पोस्ट करत सवाल विचारला आहे.
तसेच त्यांनी या पोस्टला राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेस पक्षालाही टॅग केले आहे. दरम्यान, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या पराभवामुळे भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधींना कोंडीत पकडले आहे.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.