Rahul Gandhi News : आता काँग्रेस नेत्याने केली राहुल गांधींची तुलना थेट प्रभू श्रीरामांशी

भरत यांच्याप्रमाणे आम्ही उत्तरप्रदेशमध्ये पादत्राणे पोहचले आहोत. आता रामजी (राहुल गांधी) सुद्धा येतील, असे सलमान खुर्शीद म्हणाले.
Rahul Gandhi
Rahul Gandhisarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News : कॉंग्रस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली असलेली 'भारत जोडो' यात्रा तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधून सुरु होऊन आता राजधानी नवी दिल्लीत पोहोचली आहे. ही यात्रा ८ दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी राहुल गांधींची तुलना थेट प्रभू श्रीरामाशी केली आहे. सलमान खुर्शीद यांच्या विधानाने नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi
Nashik News : नाशिकमध्ये ठाकरेंच्या गडाला हादरा; माजी आमदारासह ५० नेते शिंदे गटात प्रवेश करणार

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खुर्शीद म्हणाले "राहुल गांधी एखाद्या योगींच्या तपश्चर्येप्रमाणे आपल्या मिशनवर लक्ष केंद्रित करत आहेत. आपल्याला जॅकेट घालूनही थंडी वाजत आहे. पण, राहुल गांधी टी-शर्टमध्ये यात्रा करत आहेत. मला वाटत राहुल गांधी सुपरमॅन आहेत. ते एका योगीसारखे आहेत, जो पूर्ण लक्ष देऊन तपश्चर्या करतो." पुढे ते असेही म्हणाले, "प्रभू श्री राम यांची खडाऊ (पादत्राणे) खूप लांबपर्यंत जात असे. कधी कधी भरत पादत्राणे घेऊन रामजी पोहचत नसलेल्या ठिकाणी जात असे. भरत यांच्याप्रमाणे आम्ही उत्तरप्रदेशमध्ये पादत्राणे पोहचवले आहेत. आता रामजी (राहुल गांधी) सुद्धा येतील, असे खुर्शीद म्हणाले.

भारत जोडो यात्रेचा दुसरा आणि अंतिम टप्पा ३ जानेवारीपासून सुरु होणार आहे. सलमान खुर्शीद सोमवारी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की आमची भारत जोडो यात्रा 3 जानेवारीला यूपीमधील गाझियाबाद येथून पुन्हा सुरू होईल. यात्रा 9 दिवसांसाठी थांबवण्यात आली असून सध्या ही यात्रा दिल्लीमध्ये आहे.

Rahul Gandhi
अजितदादांचं बावनकुळेंना थेट आव्हान : 'मनावर घेतलं तर मीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेन'

दरम्यान, खुर्शीद यांच्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला हे ट्विट करत म्हणाले, सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना भगवान श्रीराम आणि स्वत:ची भरतशी केली आहे. हे धक्कादायक आहे. दुसऱ्या धर्माच्या देवासोबत तुलना करायची हिंमत तुमच्यात आहे का? रामजींचे अस्तित्व नाकारून आणि राम मंदिर रोखल्यानंतर आता ते हिंदू धर्माचा अपमान करत आहेत. राहुल गांधी हे मान्य करतात का? असा सवालही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com