Rahul Gandhi on Karnataka Election 2023: राहुल गांधी म्हणाले, कर्नाटकात आता द्वेषाचे दुकान बंद आणि प्रेमाचे दुकान सुरु...

Karnataka Elections | कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा सुफडा साफ करत ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.
Rahul Gandhi on Karnataka Election 2023:
Rahul Gandhi on Karnataka Election 2023: Sarkarnama

Karnataka Assembly Election Result 2023 : ''कर्नाटकात झालेल्या ऐतिहासिक विजयासाठी मी राज्यातील जनता, कार्यकर्त्यांना आणि तिथल्या नेत्यांचं अभिनंदन करतो. या निवडणुकीत प्रेमाने धनशक्तीवर विजय मिळवला आहे. कर्नाटकात द्वेष, तिरस्काराचे दुकान बंद झाले आहे. हा प्रेमाचा विजय आहे. कर्नाटकात द्वेष, तिरस्काराचा पराभव झाला आणि प्रेम जिंकले, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन केले. (Rahul Gandhi said, now the shop of hate is closed and the shop of love is open in Karnataka)

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालांची चर्चा देशभरात सुरू आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे. काँग्रेसच्या कार्यालयात उत्साहाचे वातावरण आहे.कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ केला आहे. दुसरीकडे दिल्लीतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. (Karnataka Elections 2023)

Rahul Gandhi on Karnataka Election 2023:
Karnataka Election Result 2023 : कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री ? डी. के. शिवकुमार की सिद्धरामय्या..

कर्नाटक निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत कर्नाटकच्या जनतेचे आभार मानले. याचवेळी त्यांनी सरकार स्थापन केल्यानंतर आपण जाहीरनाम्यात दिलेली पाच वचने मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत पुर्ण करु, अशी घोषणा केली.

कर्नाटकातील जनतेने भांडवलदारांचा पराभव केला. ही लढाई आम्ही द्वेषाच्या जोरावर नाही तर प्रेमाच्या जोरावर लढली. काँग्रेस पक्ष कर्नाटकातील गरिबांच्या पाठीशी उभा राहिला. ही लढाई आम्ही प्रेमाने लढलो. या देशावर प्रेम असल्याचे कर्नाटकच्या जनतेने आजच्या निकालातून दाखवून दिले आहे. आता कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद, प्रेमाचे दुकान खुले झाले आहे. (Karnataka Election 2023)

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची काँग्रेसची परंपरा आहे, पण पहिल्यांदाच काँग्रेसने कर्नाटकात ही परंपरा मोडली. दोन्ही नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरुन निवडणुकीपूर्वीच संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेसने ही भूमिका घेतली होती. "काँग्रेसची सत्ता आली तर नेते ठरवतील की मुख्यमंत्री कोण होणार,' असे मलिक्कार्जून खर्गे यांनी सांगितले होते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com