'आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड, श्रीमान 56'' घाबरलेत'

आरएसएस (RSS) आणि भाजपच्या (BJP) या द्वेषपूर्ण विचारसरणीवर काँग्रेस (Congress) पक्षाची प्रेमळ आणि राष्ट्रवादी विचारसरणी अधिक प्रभावी
'आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड, श्रीमान 56'' घाबरलेत'
Published on
Updated on

नवी दिल्ली : चीनच्या (China) सीमेवरील वादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर सडकून टीका केली. ''भारत सरकारकडे चीनबाबत कोणतीही रणनीती नसल्याने आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्यात आली असून श्रीमान 56'' घाबरले आहेत, अशी घणाघाती राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली आहे. राहुल गांधी यांनी एका बातमीचा हवाला दिला आहे. ज्यामध्ये परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण दलाचे प्रमुख यांचे चीन सीमा मुद्द्यावर वेगळे मत आहे.

यूएस संरक्षण विभागाने आपल्या अलीकडील अहवालात म्हटले आहे की, चीनने तिबेट स्वायत्त प्रदेश आणि भारताचा अरुणाचल प्रदेश यांच्यातील एलएसीच्या पूर्वेकडील भागात विवादित क्षेत्रामध्ये एक मोठे गाव बांधले आहे. या दाव्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी उत्तर दिले आहे. चीनचा भारतीय हद्दीत येऊन नवीन गाव निर्माण करण्याचा वाद खरा नाही, असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी गुरुवारी सांगितले. तसेच ही गावे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेतील चीनच्या हद्दीचत असल्याचे सांगितले. चीनने एलएसीच्या भारतीय संकल्पनेचे उल्लंघन केले नसल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान याचववेळी राहूल गांधी यांनी भाजप, आणि् आरएसएसच्या विचारधारेवर निशाणा साधला आहे. "आजच्या भारतात भाजप आणि आरएसएसने द्वेष पसरवला असून काँग्रेसची विचारधारा बंधुता आणि प्रेमाची आहे. आरएसएस आणि भाजपच्या या द्वेषपूर्ण विचारसरणीवर काँग्रेस पक्षाची प्रेमळ आणि राष्ट्रवादी विचारसरणी अधिक प्रभावी ठरली आहे, असा विश्वास कॉंग्रेस खासदार राहूल गांधी यांनी व्यक्त केला आहे. वर्ध्यात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना राहुल गांधीनी विचारधारेवरून भाजपवर निशाणा साधला.

भाजपच्या द्वेषपुर्ण विचारधारेमुळे काँग्रेसची विचारधारा संपत चालली आहे. काँग्रेसचे विचार आज देशभरात तळागाळापर्यंत परत पोहचवण्याची गरज निर्माण झाली आहे. ती जनतेला समजण्याची आणि समजवण्याचा गरज आहे. कलम 370, दहशतवाद, राष्ट्रीयता यावर जेव्हा चर्चा होत असते, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर द्यायला हवं. यासाठीच कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असे म्हणत, राहूल गांधी यांनी देशातून संपत चाललेली काँग्रेसची विचारधारा आम्ही परत जनतेपर्यंत पोहचवू, असा विश्वासही व्यक्त केला.

राहुल गांधी म्हणाले, 'आम्ही आमच्या विचारसरणीचा कधीही प्रचार केला नाही. आम्ही आमची विचारधारा आक्रमकपणे लोकांमध्ये पसरवली नाही. काँग्रेस अशा विचारसरणीचे पालन करते, जी हजारो वर्षांपासून भारतात अस्तित्वात आहे. 'आदि शिव, संत कबीरसारखे, गुरु नानक, हे असे विचार होते जे आपण कशासाठी उभे आहोत हे प्रतिबिंबित करतात. तर गांधीजी हेदेखील यांच्यातील दुसरे उदाहरण आहे. असेही त्यांनी नमुद केले.

'आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड, श्रीमान 56'' घाबरलेत'
सरन्यायाधीशांची भाजप सरकारला सोमवारची डेडलाईन!

2014 पूर्वी विचारधारेची लढाई केंद्रीत नव्हती, पण आज विचारधारेची लढाई सर्वात महत्त्वाची, झाली आहे. विचारधारेची लढाई आजच्या भारतात सर्वात महत्त्वाची झाली आहे. पण आज आपण आपली विचारधारा ज्या खोलीने समजून घेऊन तिचा प्रसार- प्रचार केला पाहिजे ती आपण सोडली आहे, आता आपल्या संघटनेत आपली विचारधारा अधिक खोलवर रुजवायण्याची वेळ आहे.

हिंदू आणि हिंदुत्व यातील फरक - राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, भाजप हिंदुत्वाची चर्चा करते. पण आम्ही म्हणतो की, हिंदू धर्म आणि हिंदुत्व यात फरक आहे, असे आम्ही म्हणतो. कारण फरक नसता तर नाव एकच राहिले असते. शीख आणि मुस्लिमांना मारहाण करणे हा हिंदू धर्म आहे का…नाही…हे हिंदुत्व आहे. कोणत्या पुस्तकात एका निर्दोषाला मारण्याबाबत लिहिले आहे. मी उपनिषदे वाचली आहेत, ती मी हिंदू, शीख किंवा इस्लामिक धर्मग्रंथात पाहिली नाहीत. मी ते हिंदुत्वात पाहू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com