Rahul Gandhi Support South Actress : Divya Spandana : Ramya
Rahul Gandhi Support South Actress : Divya Spandana : RamyaSarkarnama

Rahul Gandhi Support South Actress : राहुल गांधींचा भावनिक आधार नसता, तर आज जिवंत नसते ; कन्नड अभिनेत्रीची स्तुतीसुमने!

Ramya Kannada Actress : माझ्या आयुष्यावर प्रभाव पाडणारी व्यक्ती...

Rahul Gandhi Support South Actress Ramya : मला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा भावनिक आधार मिळाला नसता तर आज मी जिवंत नसते, मी आत्महत्यासुद्धा केली असती, असे कन्नड अभिनेत्री रम्या (Ramya) यांनी म्हंटले आहे. दिव्या स्पंदना (Divya Spandana) अशा नावाने प्रसिद्ध असलेली रम्या या लोकसभेच्या सदस्य (खासदार) राहिल्या आहेत.

रम्या म्हणाल्या की, "माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले, तेव्हा राहुल गांधींनी मला भावनिक आधार दिला होता.'माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर दोन आठवड्यांनी मी संसदेत गेले होते. मी कोणालाच ओळखत नव्हते, मला संसदेच्या कामकाजाची फारशी माहिती नव्हती, असे राम्या म्हणाल्या.

Rahul Gandhi Support South Actress : Divya Spandana : Ramya
Supreme Court on State Government : न्यायालयाच्या प्रश्नावरून सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने

रम्या म्हणाल्या, "मी हळूहळू सर्वकाही शिकले आणि माझ्या दुःखातून सावरताना कामावर लक्ष केंद्रित केले.मंड्याच्या लोकांनी मला साथ दिली, त्यामुळे मी आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकले. जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा माझ्या मनातही आत्महत्येचे विचार येऊ लागले. त्यावेळी राहुल गांधी यांनी मला भावनिक आधार दिला. एवढेच नाही, तर माझ्यावर माझ्या वडिलांचा सर्वाधिक प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर माझ्या आईचा प्रभाव सर्वाधिक राहिला आहे. यानंतर माझ्या आयुष्यावर प्रभाव पाडणारी तिसऱ्या क्रमांकावरची व्यक्ती म्हणजे राहुल गांधी आहेत, असे रम्या म्हणाल्या.

Rahul Gandhi Support South Actress : Divya Spandana : Ramya
Uddhav Thackeray Criticizes Opponents : ''आता राजकारणात दगडच तरंगताय आणि तेच...''; ठाकरेंनी भाजप अन् शिंदे गटाला डिवचलं

रम्या २०१२ मध्ये युवक काँग्रेसमध्ये सामील सहभागी झाल्या होत्या. काँग्रेससाठी राम्या यांनी सातत्याने प्रचार केला. राम्या यांनी २०१३ मध्ये कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकली होती. यानंतर त्या काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया प्रमुखपदी राहिल्या आहेत. पण यानंतर त्यांनी अचानक राजीनामा दिला होता. गेल्या वर्षीच राम्याने जाहीर केले होते की, त्या चित्रपटसृष्टीत परत येत आहेत. स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू करणार आहे. त्यांनी ऍपल बॉक्स स्टुडिओ नावाने प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com