Uddhav Thackeray Criticizes Opponents : ''आता राजकारणात दगडच तरंगताय आणि तेच...''; ठाकरेंनी भाजप अन् शिंदे गटाला डिवचलं

Maharashtra Politics: काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला तरी...
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन त्यावेळी दगड टाकला, तरी तो तरंगत असत. आत्ता राजकारणात तेच झालंय. प्रभू रामाचं नाव घेऊन दगडच तरंगतायत आणि दगडच राज्य करतायत अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटाला डिवचलं आहे.

रामनवमीनिमित्त उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray) च्या मुंबईतील ‘मातोश्री’निवासस्थानी रामटेकहून पायी चालत काही शिवसेना कार्यकर्ते आले होते. यावेळी ठाकरेंनी या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, ज्या हिंमतीनं रामटेक ते इथपर्यंत पायी येणं ही हिंमत आहे. ही जिद्द तुम्ही जिथून आला असाल तिथपर्यंत पोहोचवा. तुम्ही सगळे सोबत आहात हीच माझी ताकद आहे.

Uddhav Thackeray
Devendra Fadnavis On Riot: '' काही नेते भडकवणारे...''; छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचारावरुन फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

धनुष्यबाण जरी कागदावरचा नेला असला, तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत. हे फक्त बाण नाहीत, तर हे ब्रह्मास्त्र आहेत. हे सगळे ब्रह्मास्र माझ्याबरोबर आहेत असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले

धनुष्यबाण चोरला असला तरी...

“एका दृष्टीने पाहिलं, तर असं कुणीतरी कुणासाठीतरी इतके किलोमीटर पायपीट करत येणं आत्ताच्या काळात अवघड नाही, अशक्य आहे. तुम्हाला मातोश्रीत यावं आणि माझ्यासोबत उभं राहावं असं वाटणं हा मी रामाचा आशीर्वाद मानतो. रामटेकमधून निघून तुम्ही बरोबर राम नवमीला इथे पोहोचलात. काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभूराम माझ्यासोबत आहेत”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Uddhav Thackeray
BJP Savarkar Gaurav Yatra News: खासदार गिरीश बापटांच्या निधनामुळे पिंपरीतील भाजपच्या 'सावरकर गौरव यात्रे'ला ब्रेक?

“आपण एकत्र आलो, तर लंकादहन शक्य आहे..”

सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना उध्दव ठाकरे म्हणाले, रामसेतू बांधताना वानरसेना तर होतीच, पण खारही होती. तेव्हा तर खारीनंही तिचा वाटा उचलला. लोकशाही वाचवणं हे केवळ माझ्या एकट्याचं काम नाही किंवा माझ्या एकट्यासाठी नाही. आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे. आपण सगळे एकत्र आलो, तर लंकादहन करू शकणार नाही का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.